विविध खाद्यपदार्थांचा विद्यार्थ्यांनी घेतला आस्वाद
मंठा : श्रीकृष्ण पवार
सौ. द्रोपदाबाई आकात प्राथमिक शाळा येथे आनंदनगरी उत्साहात मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी मुख्याध्यापक प्रा.बाबासाहेब ताठे,उप मुख्याध्यापक राजकुमार ठोकरे, रमेश ढवळे ,एस.एन.मोरे.ज्ञानेश्वर वायाळ, महादेव नेवरे, दिनकर निर्वळ मुख्याध्यापिका एफ.ए.शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यालयाच्या प्रांगणावर विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल आकर्षक पद्धतीने थाटले होते. यामध्ये मुलींचे स्टॉल तुलनेने जास्त होते. स्टॉलला विद्यार्थ्यासह शिक्षक आणि पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी भेळ, कटलेट,वडापाव,मुगवाडा,व्हेज बिर्याणी, कचोरी,समोसा, पाणीपुरी,चणे,गुलाब जामुन, चिवडा यासारख्या खाद्यपदार्थासह मिनरल वॉटरचे आणि चहाचे स्टॉल थाटले होते. विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांनी खाद्यपदार्थाचा येथेच्छ आस्वाद घेतला. अशा प्रकारच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना निखळ आनंद तर मिळतोच ,शिवाय त्यांना व्यवसायासाठी लागणारे कौशल्य व ज्ञान प्राप्त होते.आपण व्यवसायात चार पैसे कमावू शकतो याची प्रेरणा त्यांच्या मनामध्ये निर्माण होते, असे सुनिता पवार यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका एस. एस.पवार,पि.व्ही.आवसारे,एस.यु.ताजणे आदींनी परिश्रम घेतले.







