अतुल महालनकर
बुलढाणा : १ एप्रिल २०२३ पासून हॉलमार्क असलेले दागिने वैध ठरणार आहेत. सोन्याच्या दागिन्यांची विक्री करताना त्यावर हॉलमार्क असणे बंधनकारक करण्यात आल्याने आता नियमानुसार १४, १८ ,२०, २२, आणी २४ कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क असेल तरच त्यांची विक्री करता येईल, अन्यथा संबंधित सराफा व्यापाऱ्याला दागिन्याच्या किमतीच्या पाचपट दंड अथवा एक वर्षाचा कारावास होऊ शकतो.
एक एप्रिलपासून सक्ती
दागिन्यांवर हॉलमार्क लावण्याबाबत सर्व सराफा व्यापाऱ्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. हॉलमार्कची ही सक्ती १ एप्रिल राहणार आहे.
सराफांना माहिती पोर्टलवर अपलोड करावी लागणार
१ एप्रिलपासून सहा अंकी हॉलमार्किंग वैध राहणार असून, त्यासाठी सराफांना माहिती पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहे. त्याशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत. ग्राहकांच्या हितासाठी मंत्रालयाने असा निर्णय घेतला आहे.
सराफा व्यावसायिक म्हणतात….
ग्राहकांसाठी ही अत्यंत चांगली बाब आहे. सरकारच्या या बंधनामुळे ग्राहकांची फसवणूक होणार नाही, भारतीय मानक ब्युरोमुळे हॉलमार्क हे त्रिकोणी आकाराचे आहे. त्यावर हॉलमार्किंग सेंटरच्या लोगोसह सोन्याची शुद्धता ही लिहिलेली असते, तसेच त्या दागिन्यांच्या उत्पादनाचे वर्ष आणि निर्मात्यांचा लोगो देखील त्यावर असतो. ज्या ठिकाणी हॉलमार्किंगचे केंद्र नाही, तेथे अडचणीचे होऊ शकते. ग्राहकांना आता प्रश्न पडला असल, का नमक है हॉलमार्क आहे तरी काय? हॉलमार्क म्हणजे त्या दागिन्यांच्या शुद्धतेचे प्रमाणीकरण करण्याचे एक महत्त्वाचे साधन म्हणून ओळखले जाते. एखाद्या धातूची विश्वासार्हता प्रदान करण्याचे माध्यम म्हणजे हॉलमार्किंग आहे. त्याचे निरीक्षण भारतीय मानक ब्युरोद्वारे केले जाते. हॉलमार्किंगची संपूर्ण प्रक्रिया देशभरातील हॉलमार्किंग केंद्रांवर केली जाते. सराफा व्यावसायिक म्हणतात….. – आनंद वर्मा, सराफा व्यावसायिक, बुलढाणा
काय आहे हॉलमार्क
सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आता प्रश्न पडला असेल, की नेमके हे हॉलमार्क आहे तरी काय ? हॉलमार्क म्हणजे त्या दागिन्यांच्या शुद्धतेचे प्रमाणीकरण करण्याचे एक महत्त्वाचे साधन म्हणून ओळखले जाते. एखाद्या धातूची विश्वासार्हता प्रदान करण्याचे माध्यम म्हणजे हॉलमार्किंग आहे. त्याचे निरीक्षण भारतीय मानक ब्युरोद्वारे केले जाते. हॉलमार्किंगची संपूर्ण प्रक्रिया देशभरातील हॉलमार्किंग केंद्रांवर केली जाते.
शासनाने हॉलमार्किंग करावी ग्राहकांसाठी उत्तम मानत, पण हॉलमार्किंग सेंटरची उपलब्धता लक्षात घेऊन त्यामधे ग्रामीण भगातील छोट्या दुकानदारांची होणारी गैरसोय विचारात घेता हे नियम सोपे व सुटसुटीत पद्धतीने लागू करण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे ग्राहक व दुकानदार यांच्यातील समन्वय राखण्यास मदत होईल.
नंदन दर्यापुरकर
सोने चांदीचे व्यापारी , देऊळगांवराजा









