श्रीकृष्ण पवार / मंठा प्रतिनिधी
ससून डॉक येथील मच्छीमार बांधवांच्या समस्या संदर्भात लोकनेते आमदार राजेश राठोड यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केला होता त्या संदर्भात माननीय मंत्री महोदय श्री सुधीरजी मुनगंटीवार विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर संबंधित खात्याचे सचिव व विविध अधिकारी या समवेत मच्छीमार बांधव व कंत्राटदार यांची सह्याद्री अतिथिगृहावर काल दिनांक 3 एप्रिल रोजी बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये विविध समस्या संदर्भात लोकनेते आमदार राजेश राठोड यांनी शासनाच्या निदर्शनास आणून देताच माननीय विधानसभा अध्यक्ष व माननीय मंत्री महोदय यांनी अधिकाऱ्यांना व कंत्राटदारांना तात्काळ सूचना देऊन समस्यां दुरुस्त करण्यासंदर्भात तात्काळ आदेश दिले सबंध मच्छीमार बांधवांनी कित्येक दिवसापासून प्रलंबित असलेल्या त्यांच्या समस्या शासन दरबारी मांडल्यामुळे लोकनेते आमदार राजेश राठोड यांचे आभार व्यक्त केले









