वसमत ( इसाक पठाण)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती समीतीच्या अध्यक्षपदी डॉ.एम.आर.क्यातमवार यांची निवड करण्यात आली आहे
वसमत येथे दिनांक 4 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सव समितीच्या निवडीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत अध्यक्षपदी डॉ एम आर क्यातमवार यांची निवड करण्यात आली.
वसमत शहरात 15 वर्षा पासून कैलास जोंधळे यांनी महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सव समितीची सुरुवात केली. समितीच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविले जातात व विद्यार्थ्यांना शालेय ड्रेसेस वाटप करण्यात येते,महापुरुषांच्या जीवनावर स्पर्धा परीक्षाचे आयोजन करण्यात येते शालेय साहित्य वाटप करण्यात येते महापुरुषांचे विचार घराघरात पर्यंत पोहचवण्याचे काम समितीच्या माध्यमातून होत आहे.या जयंतीची आयोजक कार्याध्यक्ष कैलास जोंधळे यांनी सुचविले की अध्यक्ष डॉ.एम.आर.क्यातमवार सर्वानुमते बहुमतानी त्यांची निवड करण्यात आली.आणि त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
त्यावेळी उपाध्यक्ष दिवाकर पुंडगे,कार्याध्यक्ष कैलास जोंधळे,सचिव आकाश दातार, स्वागत अध्यक्ष संजय दादा खंदारे.कोषाध्यक्ष युवराज आवटे.सहसचिव देवानंद सोनाळे .सहकोषाध्यक्ष आनंद दातार . सदस्य अरविंद कठाळे सुनील काळे . विजय लांडगे .रामू नरवाडे संदीप थोरात अरुण हनुमंत नामदेव नंदनवरे कपिल खंदारे संदेश खंडागळे अमोल सुतारे रतन गजभारे विनोद आटकोरे सुरेश खरे आदिंची निवड करण्यात आली .









