वसमत ,(इसाक पठाण)
वसमत तालुक्यातील दिग्गज शेतकरी नेते गोरख पाटील प्रल्हाद राखुंडे श्याम कदम आदींनी बी आर एस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे
शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष गोरख पाटील व प्रल्हाद राखुंडे हे मातब्बर नेते मंडळी एकेकाळी शरद जोशी व शंकर अण्णा धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेत खांद्याला खांदा लावून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करत होती कालांतराने ही नेते मंडळी विभक्त होऊन वेगवेगळ्या पक्षात गेल्याने शेतकरी संघटनेला व शेतकरी चळवळीला मरगळ आली होती
तेलंगाना येथील बी आर एस पक्षाने महाराष्ट्र राज्यात नांदेड मार्गे एन्ट्री केली तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या शेतकरी हिताच्या योजने ची भुरळ राज्यातील शेतकऱ्यांना पडली असून के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली बी आर एस पक्षात इन्कमिंग सुरू झाली आहे नांदेड जिल्ह्यातील दिग्गज युवा नेते प्रवीण जेठेवाड यांनी माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांना बी आर एस पक्षात येण्यासाठी गळ घातली तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या शेतकरी हिताच्या कार्याला प्रभावित होऊन शंकर अण्णा धोंडगे यांनी लोहा येथे प्रचंड शक्ती प्रदर्शन करून आपल्या शेकडो समर्थकास अब की बार किसान सरकार चा नारा देत बी आर एस पक्षात प्रवेश केला शंकर अण्णा धोंडगे यांनी बि आर एस पक्षात प्रवेश केल्यानंतर पक्ष वाढीसाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले असून पूर्व श्रमीचे शेतकरी संघटनेचे नेते यांना बी आर एस पक्षात प्रवेश देण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे त्या अंतर्गत वसमत तालुक्यातील शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष गोरख पाटील शेतकरी नेते प्रल्हाद राखुंडे तसेच श्याम कदम व देवानंद व्यवहारे यांना बी आर एस पक्षात प्रवेश करण्याचे निमंत्रण देऊन हैदराबाद येथे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या हस्ते या मान्यवरांना पक्षप्रवेश दिला यावेळी नांदेड येथील बी आर एस चे नेते प्रवीण जेठेवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते
गोरख पाटील प्रल्हाद राखुंडे व श्याम कदम यांच्या बी आर एस प्रवेशाने तालुक्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा देणारा एक नवीन पक्ष उदयास आला असून त्यामुळे तालुक्यातील राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे









