बदनापूर
खासगी शाळांबाबत वारंवार येणार्या तक्रारी लक्षात घेऊन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थी- पालक जागृती अभियान संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत आहे.
या अभियानाबाबत माहिती देतांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे नेते सिद्दीक शेख यांनी सांगितले की, बर्याचदा विद्यार्थी आणि पालक शालेय नियमांबाबत अनभिज्ञ असतात. त्याचा गैरफायदा घेत अनेकदा काही खासगी शाळा विद्यार्थी व पालकांची दिशाभूल करत आपला मनमानी व मुजोर कारभार तसाच चालू ठेऊन पालकांचे आर्थिक शोषण करतात. या सर्व गोष्टींना आळा बसण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे एक नियमावली जाहिर करण्यात आली असून जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.








