वसमत (इसाक पठाण)
युवकांना त्यांच्या जीवनाशी निगडित सर्व माहिती देणारे जागतिक दर्जाचे एक अद्यावत आधुनिक युवक माहिती केंद्र हिंगोली जिल्ह्याच्या ठिकाणी सुरू करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील अशी माहिती भाजपाचे हिंगोली प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर यांनी दिली
युवकांना त्यांच्या जीवनाशी निगडित सर्व माहिती देणारे एक अद्यावत आधुनिक युवक माहिती केंद्र जिल्ह्यात आज घडीला नसल्याने शासनाच्या विविध योजनेची माहिती युवकांना होत नाही त्यामुळे युवकांना एकाच छताखाली सर्व योजनांचे मार्गदर्शन करणारे एक स्वतंत्र माहिती कार्यालय हिंगोली जिल्ह्याच्या ठिकाणी सुरू करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील
या माहिती केंद्रात सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहून युवकांना योग्य मार्गदर्शन करतील व युवकांना शासनाच्या विविध योजनांचा कसा फायदा उचलता येईल यासाठी प्रयत्न केले जातील असेही भाजपाचे जिल्हा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर यांनी सांगितले









