वसमत (इसाक पठाण)
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच रमजान ईद निमित्त कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस विभागाच्या वतीने दंगा नियंत्रण प्रात्यक्षिक सादर करण्यात आले
वसमत शहर पोलीस स्टेशनच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व रमजान ईदच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन वसमत शहर ठाणेदार चंद्रशेखर कदम यांनी दंगा काबु योजनेचे प्रात्यक्षिक (सराव) घेतले सदर सरावा करिता शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी एपीआय भिंगारे . महिला पो .नि .शेटे मॅडम .व शहर पोलीस स्टेशनचे 25 ते 30 अंमलदार व आर सी पी पालटुन व प्रशिक्षक मंगळूरकर व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .









