वसमत (इसाक पठाण)
वसमत येथील शासकीय स्त्री रुग्णालय येथे जागतिक होमिओपैथी दिना निमित्त जागतिक होमिओपैथी चे जनक डॉ शामुआल हैनिमेन यांच्या 268 वी जयंती निमित्तकार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ एम क्यातमवार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर काळे , डॉक्टर सेलुकर , डॉक्टर बोरगे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच जागतिक होमीओपैथी दिवसा निमित्त होमिऔपैथीक मध्ये उलेखनीय काम केलेल्या डॉक्टरांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला
त्यामध्ये . डॉ जटाळे .डॉ भरत येवले . डॉ शेळके . डॉ भोसले .डॉ तिम्मेवार . डॉ अग्रवाल . यांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला तसेच डॉ येवले .डॉ जटाळे . डॉ बारे . यांनी होमी ओपैथीक बद्दल मार्गदर्शन केले
यावेळी डॉ. एम आर क्यातमवार .डॉ काळे ,डॉ .बोरगे यांनी होमीओपैथीक क्षेत्राबद्दल विचार मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.जयेश अग्रवाल यांनी केले या कार्यक्रमानंतर महिला स्त्री रुग्णालय येथे रुग्णांना पौष्टिक लाडू चे वाटप करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसमत तालुका होमीओपैथी असोसीअशन यांनी प्रयत्न केले व मान्यवरांचे आभार मानले









