वसमत इसाक पठाण
टोकाई सहकारी साखर कारखाना निवडणुकीत अड. शिवाजीराव जाधव विरोधात सर्व पक्षीय नेते एकवटले असून निवडणुकीत त्यांच्या पनाल विरोधात सर्व पक्षीय तगडा पनाल उभा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत
वसमत तालुक्यात टोकाई सहकारी साखर कारखाना हा राजकीय केंद्रबिंदू राहत आला आहे तालुक्यातील ज्येष्ठ नेते शंकरराव खराटे यांनी कुरुंदा गिरगाव व कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव या परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी टोकाई सहकारी साखर कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यात ना त्या कारणामुळे कारखाना सुरू करता आला नाही कारखान्याची चिमणी काही पेटली नाही नुसता सांगाडा उभा राहिला उभारणीपूर्वीच बंद पडलेल्या टोकाईला सुरू करण्याचा निश्चय सहकार क्षेत्रात नवख्या असलेल्या एडवोकेट शिवाजीराव जाधव यांनी केला त्यांनी स्वतःची आर्थिक मदत देऊन कारखान्याची उभारणी केली व कारखाना सुरू केला.
टोकाई कारखाना सुरू करण्याचे श्रेय एडवोकेट शिवाजीराव जाधव यांना जाते यात दुमत नाही याचा फायदा त्यांना टोकाईच्या निवडणुकीत सुद्धा झाला त्यांचे पॅनल विजय झाले परंतु कारखाना चालविण्याचा अनुभव नसल्यामुळे तसेच कारखानदारी समोरील अनेक अडचणीमुळे त्यांना अध्यक्षपदी राहत असताना सुद्धा अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले दरम्यान त्यांनी टोकाईचा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला . टोकाईच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याच संचालक मंडळातील भाजपचे तालुका अध्यक्ष खोबराजी नरवाडे यांनी हातात कारभार घेऊन कारखाना सुरळीत चालविण्यात साठी हालचाली सुरू केल्या संचालक मंडळातील एका गटाने खोब्राजी नरवाडेना पुढे केले शिवाजीराव कारखान्याच्या राजकारणातून बाहेर पडले आता खोबराजी पाटील अध्यक्ष होऊन कारखाना चालवतील असे वाटत असताना अडवोकेट शिवाजीराव जाधव यांनी पुन्हा एन्ट्री करुन अध्यक्ष पदासाठी अर्ज भरला व पुन्हा अध्यक्षपदाची निवडणूक लढवली सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या एकाच संचालक मंडळातील दोन उमेदवारात अध्यक्ष पदाची निवडणूक झाली या निवडणुकीत शिवाजीराव जाधव यांनी भाजपचेच तालुका अध्यक्ष खोबराजी नरवाडे यांचा पराभव केला आणि याच निवडणुकीत भाजपच्या सत्ताधारी संचालक मंडळात उभी फूट पडून दोन गट तयार झाले त्यानंतर
सन 2023 च्या गाळप हंगाम सुरू झाला परंतु काही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाचे बिल मिळाले नाही शेवटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आमरण उपोषण करावे लागले
अशा एकंदरीत परिस्थितीत कारखान्याची निवडणूक जाहीर झाली व उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे आता पर्यंत 61 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे .1 जून अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे टोकाईच्या निवडणुकीत अड शिवाजीराव जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तसेच स्वतंत्र पनाल उभा करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहे तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील त्यांचे विरोधक तसेच शिवसेना शिंदे गटाचे काही नेते, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे काही नेते या निवडणुकीत शिवाजीराव जाधव यांच्या विरोधात एकत्र आल्याचे चित्र दिसून येत असून एडवोकेट जाधव विरोधात एक तगडा पॅनल उभा करण्याचे प्रयत्न सुरू केले जात आहे यासाठी तालुक्यातील काही ज्येष्ठ नेते पडद्यामागे राहून त्यांना रसद पुरविण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे टोकाईच्या निवडणुकीत एडवोकेट शिवाजीराव जाधव यांना पराभूत करून त्यांना लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीतून हद्दपार करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी कंबर कसली असल्याची चर्चा तालुक्यात होत आहे.









