वसमत इसाक पठाण
वसमत तालुक्यातील मौजे कुरुंदा येथे आमदार राजुभैया नवघरे यांच्या माध्यमातून 1 कोटी निधी मंजूर असलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व पायाभरणी सोहळा सर्व मान्यवर व नागरिकांच्या उपस्थितीत माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाशजी दांडेगावकर यांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच आ.राजुभैया नवघरे यांच्या संकल्पनेतून जनकल्याण कार्यक्रमा अंतर्गत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना कार्ड व प्रमाणपत्रे वाटप करण्यात आले.
यामध्ये राशन कार्ड, जात प्रमाणपत्र, ई-श्रम कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, संजयगांधी सेवा योजना, श्रावण बाळ सेवा योजना आदी योजनांचा समावेश आहे. तसेच विविध विकास कामांच्या भूमिपूजन व पायाभरणी सोहळ्यामध्ये मुस्लीम समाजाच्या शादिखान्याची पायाभरणी तसेच कानोडी समाज सांस्कृतिक सभागृहाचे भूमिपूजन तसेच सा.न्या.वि. अंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह भूमिपूजनचा समावेश आहे.
याप्रसंगी आ.राजुभैया नवघरे यांनी उपस्थित राहून भूमिपूजन केले व नागरिकांशी संवाद साधून विविध विकास कामांची व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी माजी नगराध्यक्ष अ. हाफिज अ. रहेमान .चंद्रकांत पाटील दळवी, मुंजाजी पाटील दळवी, बाबुराव पाटील दळवी, आशीर्वाद पाटील इंगोले, ताहेर भाई, दिलीप सोनटक्के, अमोल इंगोले, मेहमूद भाई, गणपतराव सिद्धेवार, काशीनाथराव झिळे, अतुल दळवी, बालाजी दळवी, देवानंद दळवी, प्रथमेश गुळगुळे, लक्ष्मण शिंदे, विकास दळवी, दिलीप काळे . राष्ट्रवादी काँग्रेसचे वसमत शहराध्यक्ष शेख आयुब पॉप्युलर . वसमत शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख अलीमुद्दीन, हारुण भाई दालवाले .राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .








