वसमत/ इसाक पठाण
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी खा.विनायक राऊत व नांदेड हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने माजी मंत्री डॉ जयप्रकाश मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले.
शिवसेना सचिव खा.विनायक राऊत व हिंगोली नांदेड परभणी संपर्कप्रमुख बबनरावजी थोरात यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल उपविभागीय कार्यालय येथे आज रोजी निवेदन देण्यात आले त्यावेळी माजी मंत्री डॉ जयप्रकाश मुंदडा, ठाकरे गट जिल्हाप्रमुख संदेश देशमुख , सहसंपर्कप्रमुख सुनील भाऊ काळे .अनिल कदम .देविदास कराळे पाटील .बालाजी तांबोळी . डॉ.धोंडीराम पार्डीकर कर .ज्ञानेश्वर झटे .शहर प्रमुख काशिनाथ भोसले .रमेश जाधव . बालाजी कानडे .रविराज देशमुख .ज्ञानोबा चौरे .रुस्तुम सारंग .धनंजय गोरे .राजू भोसले .शिवसेना ठाकरे गटाचे उपदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .








