बदनापूर / आदिल खान
छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून रोजी याच दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या दिवसाचे महत्त्व आणखी दृढ करण्यासाठी ‘शिवस्वराज्य दिन’ साजरा केला जातो. त्यानिमित्त मांजर गाव येथे
महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची स्थापना करणार्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा दिवस अर्थात 6 जून हा ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून मोठया उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी स्वराज्यगुढी उभारुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व ग्रामपंचायत मांजर गाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यामधे नुकत्याच दहावी परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या
https://gaavmat.in/wp-content/uploads/2023/06/IMG-20230606-WA0597.jpg
ऋतुजा नारायण दिवटे 92.25%
गायत्री भगवान डाके 88.20,%
मयुरी महेंद्र आरसुळ 85.07%
या विद्यार्थिनींचे कौतुक करुन सत्कार करण्यात आला तसेच गावातील उत्तीर्ण झालेल्या सर्वच विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी गावचे सरपंच अनिल गायकवाड, उपसरपंच शहीनाथ अरसुळ,ग्रामसेवक सिद्धार्थ घोडके,सर्व ग्रामपंचायत सदस्य, संजय आरसुळ, शेख रफिक, निवृत्ती देहडे, कल्यान डाके, यांच्यासह शिवराम भाऊ डाके, मनोहर डाके, पत्रकार आदिल खान,नारायण दिवटे,भगवान डाके, रामू वाघ, अशोक आरसुळ, रवी अरसुळ, किसन चाळगे, ग्रामपंचायत कर्मचारी लहू वाघ, भारत वाघ, विष्णू वाघ, अंगणवाडी शिक्षिका,अंगणवाडी मदतनीस अशा वर्कर व गावकऱ्यांची मोठी उपस्थिती होती









