फलटण / अमिर शेख
फलटण मुस्लिम बांधवांनी नेहमीच समाजापुढे आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे गत वर्षांप्रमाणे यंदाही येणाऱ्या 29 जून रोजी बकरी ईद यादिवशी आपल्या हिंदू समाजबांधवांचा “आषाढी एकादशी” हा पवित्र सण येत असल्याने त्यादिवशी कुर्बानी न करता शुक्रवार दि.30 जून रोजी कुर्बानी करण्याचा व दि.29 जून रोजी केवळ ईदची नमाज अदा करण्याचा निर्णय घेत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे पुन्हा एकदा दर्शन दिले आहे..!








