फलटण /अमीर शेख
फलटण शहरात सध्या मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे तसेच काही ठिकाणी स्वच्छता, साफसफाई ची कामे वेळेवर झाली नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्यात मच्छर वाढले आहेत त्यामुळे आजारपणात वाढ झाली आहे त्यासाठी स्वच्छता अभियान चालू करून फवारणी करावी यासाठी राष्ट्रीय काँग्रेस फलटण च्या वतीने नगरपरिषद प्रशासनास निवेदन देऊन वरील समस्या बाबतीत तातडीने उपाय योजना करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
याप्रसंगी नगरपरिषद अधिकाऱ्यांना निवेदन देतांना फलटण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष श्री. महेंद्र सुर्यवंशी (बेडके), शहर काँग्रेस चे अध्यक्ष श्री. पंकज पवार,तालुका कार्याध्यक्ष श्री. अमिरभाई शेख,जिल्हा अनूसुचित जाती सेलचे उपाध्यक्ष श्री.सिद्धार्थ दैठणकर, अल्पसंख्याक विभागाचे तालुका अध्यक्ष श्री. ताजुद्दिन बागवान,शहर अध्यक्ष श्री. अल्ताफभाई शेख उपस्थित होते.








