चिपळूण : ( विश्वनाथ पंडित)
सावर्डे येथील महापुरुष मंदिर दुरुस्तीच्या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी तालुकाप्रमुख संदीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली मंदिराच्या बाहेरच रस्त्यावरती भर पावसात महाआरतीने जागर केला. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामामुळे महापुरुष मंदिराच्या पायऱ्या वर्षभरापूर्वी तोडल्या गेल्या त्यामुळे मंदिराला धोका निर्माण झाला असून.पायऱ्या नसल्याने पूजा अर्चा बंद आहे. वारंवार ग्रामस्थांनी मागणी करूनही राष्ट्रीय महामार्ग खाते व ठेकेदार कंपनी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
चिपळूण तालुकाप्रमुख संदीप सावंत यांच्यासोबत उपजिल्हाप्रमुख रवीशेठ सुर्वे, उपतालुका प्रमुख लक्ष्मण कोकमकर, दिनेश वहाळकर, दिनेश घोरपडे, वसंत गोमाणे, विजय नेवरेकर, अनंत निर्मळ, नयन कुळे, सिताराम राणे, संभाजी पालशेतकर, विजय तांदळे जयराम म्हालीम, तुकाराम मिस्त्री, राजेश शिरकर ,सुजित शिरकर, शांताराम राणे, मनोज खांडेकर, संतोष लाड, सागर सावंत ,प्रशांत सावंत, चिराग सावंत तसेच स्थानिक ग्रामस्थ, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








