. ■
जालना / प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व मंडल स्तंभ स्मारक समितीच्या वतीने दोदडगाव (ता.अंबड) येथे ७ ऑगस्ट ‘मंडल दिन’ निमित्त आयोजित ‘सामाजिक न्याय मेळावा’स मराठवाड्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन या मेळाव्याचे ‘मुख्य संयोजक’ तथा महाराष्ट्र विधानमंडळ काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदेतील प्रतोद आ.श्री.राजेश राठोड यांनी केले आहे.
ओबीसी, व्हिजेएनटी, एसबीसी, अल्पसंख्याक समाजाच्या हक्कांसाठी दोदडगाव ता. अंबड जी. जालना येथील देशातील पहिल्या मंडल स्तंभावर ७ ऑगस्ट रोजी 'मंडल दिन' निमित्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा. श्री. नानाभाऊ पटोले यांच्या सूचनेनुसार व त्यांच्या अध्यक्षतेखाली या 'सामाजिक न्याय मेळाव्या'चे आयोजन करण्यात आलेले आहे.
काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित या सामाजिक न्याय मेळाव्याचे उद्घाटन सकाळी ११ वाजता होणार असून उद्घाटक म्हणून मा. नानाभाऊ पटोले आणि मुख्य अतिथी म्हणून विधानमंडळ गटनेते मा. आ. श्री. बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री मा. आ. श्री. अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री मा. आ. श्री. पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते मा. आ. श्री विजय वडेट्टीवारसह महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे इतर सदस्य व विविध सेल चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या मेळाव्यास विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
या मेळाव्यासाठी माजी आ. डॉ. नारायण मुंढे, मुख्य संयोजक आ. राजेश राठोड, कार्यक्रमाचे संयोजक तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रा. सत्संग मुंढे यांच्यावर राज्य काँग्रेस कमिटीतर्फे विशेष जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने मराठवाड्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे.









