वसमत / इसाक पठाण
हजरत खाने आलम ( रहे ) यांच्या ऊर्सानिमित्त वसमत चे माजी नगर अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अ. हफीज अ. रहमान यांच्यावतीने दिला जाणारा यावर्षीचा जीवन गौरव पुरस्कार शहरातील प्रतिष्ठित सामाजिक व ज्येष्ठ नागरिक हाजी मन्सूर खान यांना आमदार राजू नवघरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला
वसमत चे माजी नगराध्यक्ष अ हफीज अ रहेमान हे दरवर्षी हजरत खाने आलम (रहे) यांच्या ऊर्सानिमित्त समाजात उत्कृष्ट सामाजिक सेवा करणाऱ्या व्यक्तीस जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करतात यावर्षी चा जीवनगौरव पुरस्कार वसमत शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा प्रतिष्ठित नागरिक हाजी मन्सूर खा मौजम खा यांना देण्यात आला
गुरुवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी झेंडा चौक येथील हजरत खाने आलम ( रहे )दर्गाह येथे आमदार राजू नवघरे यांच्या हस्ते हाजी मसूर खान यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदानइसाक पठाण करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष अ हफीज अ रहेमान, माजी नगराध्यक्ष खलील अहमद, ज्येष्ठ नागरिक जबी उल्ला खान, ज्येष्ठ नागरिक फारुख पाशा, माजी नायब तहसीलदार शेख करिमोद्दीन, एडवोकेट सिराज आलम, एडवोकेट शेख हारुण, काँग्रेसचे शहर अध्यक्ष शेख अलीमोद्दीन, ज्येष्ठ पत्रकार इसाक पठाण, पत्रकार फेरोज पठाण, पत्रकार शरीफ आलम,शेख महेबुब, सय्यद इसरार, शेख हारुण दालवाले, अफरोज कादरी,अफसर लढ्ढा,उमर भाई,शेख अतिक पापूलर,जावीद टेलर,अमजद सिद्दीकी,रशिदोद्दीन,या मान्यवरांसह शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी आमदार राजू नवघरे,अ हफीज अ रहेमान, शेख करिमोद्दीन यांनी हाजी मन्सूर खान यांच्या कार्याचा गौरव केला









