वसमत (इसाक पठाण )
गणेश उत्सवा दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम व सर्व पोलिस कर्मचाऱ्यांचे कौतुक आभार व सत्कार समारंभ संपन्न झाला.
गणेश उत्सवाच्या काळात शहरात सतत दहा दिवस परिश्रम घेऊन कायदा व सुव्यवस्था राबविण्याबरोबरच गणेश मिरवणुका शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या शहर पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम व सर्व पोलिस कर्मचाऱ्यांचे कौतुक आभार व सत्कार समारंभ श्री श्रध्दांलिंग गणेश मंडळ शुक्रवार पेठ व अविनाश पाटील गायकवाड मित्र मंडळच्या संयुक्तपणे आयोजित करण्यात आला होता
यावेळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या बरोबर पोलिस उपनिरीक्षक राजू सिद्दीकी तसेच सर्व पोलिस कर्मचाऱ्यांचे पुष्पहार शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी अविनाश पाटील गायकवाड, भगवान वाघ , त्रंबक गायकवाड , शाम दातार ,अशोक कांचगुडे ,बबन कदम ,गौतम कांबळे, गजानन डरंगे ,गणेश वाघ , संजय जाधव, विठ्ठल गायकवाड , पाराजी जोगदंड , अनंता अफुणे , दिपक घोगरे, शेलेश सादुलवार ,कपिल वाघ, योगेश गायकवाड , धम्मपाल कांबळे, राम लोणारे ,रवि मानेकर ,नितीन येमेकर ,सुभाष कल्याणकर, योगेश वाघ ,नवनाथ शिंदे, गोविंद धवन, आदी गणेश मंडळ व मित्र मंडळाचे सदस्य उपस्थीत होते .









