वसमत (इसाक पठाण )
वसमत ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत भोरिपगाव येथे एक गाव एक गणपती उपक्रम राबविल्या बद्दल मंडळाचे अध्यक्ष सुनील साहेबराव आगलावे यांचा उप विभागीय पोलीस अधिकारी संदीप शेळके यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल काचमांडे यांनी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या 48 पैकी 25 गावात एक गाव एक गणपती हा उपक्रम यशस्वीरीत्या राबवले या उपक्रमात सहभागी असलेल्या गावातील गणेश मंडळाच्या अध्यक्षांचा सत्कार सोहळा ग्रामीण पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आला होता.
या सोहळ्यात भोरिपगाव येथील गणेश मंडळाचे अध्यक्ष सुनील साहेबराव आगलावे यांचा उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप शेळके यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी भोरीपगाव येथील गणेश मंडळाचे निवृती सटवाजी आगलावे,बाला मोहिते, रामप्रसाद बोडखे, आदिनाथ आगलावे,अमोल आगलावे,रामा खैरे,शंकर सावंत,नरु अडकिणे,हरि बोडखे,करण खैरे,भागवत सावंत, नारायण आगलावे, जगन्नाथ आगलावे,उमेश आगलावे,राजू सावंत आदी उपस्थित होते









