बीड / अँड. ताज अन्सारी
किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर एकाने थेट गोळीबार केला असून यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्या छातीत गोळी घुसली आहे. गंभीर जखमी झालेल्या रुग्णाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.सदर घटना बीड शहरात घडल्याने खळबळ उडाली आहे.
प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला छत्रपती संभाजीनगरला हलवण्यात आले आहे. ही घटना बीड शहरातील शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पात्रुड गल्ली माळी वेस येथे रात्री बाराच्या दरम्यान घडली. घटना घडल्यानंतर आरोपीने पोबारा केला. पोलिसांचे दोन पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आले आहेत. मनोज दत्ताराव जाधव (वय 35 वर्ष, रा. पाथरूड गल्ली, माळी वेस बीड) असे गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.भाकरी मागितल्याच्या कारणावरून सदर घटना घडल्याचे बोलले जात आहे.









