वसमत (इसाक पठाण )
वसमत विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजू भैय्या नवघरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 5,6 व 7 ऑक्टोबर 2023 रोजी तीन दिवसीय ध्यानोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजू भैया नवघरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट, हैद्राबाद व इंदिरा गांधी नर्सिंग कॉलेज वसमत यांच्या वतीने ध्यानशिबीर कार्यक्रमाचे आयोजन इंदिरा गांधी नर्सिंग कॉलेज वसमत येथे करण्यात आले आहे
गुरुवार दिनांक 5 आक्टोबर रोजी शिबिराचे उदघाट्न अतिश भैय्या दांडेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.
तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन लक्ष्मीकांत भैय्या नवघरे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.विजयलक्ष्मी मालू मानसोपचार तज्ञ, श्रीमती सुशीला मुंदडा हट्योग प्रशिक्षक, प्रशिला पडघणे हार्टफुनेस प्रशिक्षक, गणेश पडघने यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून चंद्रकांत बागल (विधानसभा अध्यक्ष रा.कॉं.पा. वसमत) देशमुख , वगेवार यांची उपस्थिती होती.
ध्यान साधना केल्यामुळे मानव मनावर ताबा मिळतो. आपले जीवन सुखमय जगण्यास सुरुवात करतो ध्यान साधनाची मानवावर अनेक फायदे आहेत.
त्यामुळे इंदिरा गांधी नर्सिंग कॉलेज वसमत यांच्या वतीने वसमत विधानसभेचे आमदार राजू भैया नवघरे यांच्या जन्म जन्मदिनानिमित्त दिनांक 05,06, व 07 या तारखेपर्यंत ध्यानोउत्सव हा अतिशय चांगला उपक्रम राबवून त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे निमंत्रक समृद्धी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रमेश मानवते व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रतिभा मानवते होते.
इंदिरा गांधी नर्सिंग कॉलेजमधील सर्व विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.संदीप मानवते, प्रा.बळीराम परडे, प्रा.रुपाली कांबळे, प्रा.भाग्यश्री भिसे, प्रा.सानिका व्यवहारे, शेख मोहसीन सर, अनिल खंदारे, विजय वाघमारे आदीनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु.माधुरी इंगोले व विशाखा सोनटक्के यांनी केले व प्रा.भाग्यश्री भिसे यांनी आभार मानले.








