वसमत (इसाक पठाण)
एकच मिशन मुस्लीम आरक्षरण असा एल्गार करित मुस्लिम समाजाला न्यायालयाने शिक्षणात वैध ठरविलेले 5 टक्के आरक्षण तात्काळ लागू करण्यात यावे अशी मागणी वसमत येथील मुस्लिम बांधवांनी निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
सबंध राज्यासह देशभरातील मुस्लिम समाजाची शैक्षणिक व आर्थिक स्थिती मागास समाजापेक्षाही दयनीय आहे हे सिध्द करण्यासाठी कुठल्याही आयोग / समितीची तशी आवश्यकता नाही, परंतु सदर्भीय १ ते ३ आयोग/समितीने आपल्या अहवालात मुस्लिम समाजाची अवस्था अनुसुचित जाति-जमाती पेक्षाही वाईट असल्याचे नमुद करुन मुस्लिम समाजाच्या विकासासाठी अनेक शिफारशी केल्या आहेत, ज्यामध्ये शासकीय नौकऱ्या व शिक्षणामध्ये आरक्षण ही एक महत्वाची शिफारस आहे.
राष्ट्रीय धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्यांक आयोगाने (रंगनाथ मिश्रा आयोग) मुस्लिम समाजाला स्वतंत्र १०% आरक्षण देण्याची शिफारस केली आहे. तर राज्य सरकारने नेमलेल्या महमूद-उर-रहमान समितीने मुस्लिम समाजाला ८% आरक्षण देण्याची शिफारस केलेली आहेच. त्याच बरोबर, जेव्हा मुस्लिम आरक्षणास मुंबई उच्च न्यायालयाने शासकीय सेवेतील आरक्षण रद्द केले; परंतु मुस्लिम समाजाचा शैक्षणिक मागासलेपण मान्य करुन मुस्लिम समाजाला शिक्षणात ५% आरक्षण कायम ठेवले. परंतु त्यानंतर राज्य सरकारने नवीन आध्यादेश पारित न केल्याने न्यायालयीन कसोटीत उत्तीर्ण झालेले शैक्षणिक आरक्षण मुस्लिम समाजास मिळू शकले नसल्याने या समाजात शैक्षणिक अनुशेष वाढत आहे. माणसाच्या विकासाची, प्रगतीची प्रथम पायरी म्हणजे शिक्षण होय. परंतु मुस्लिम समाज नेमका याच पायरीवर अडकलेला असल्याने किंबहुना ही पायरी अद्याप चढलाच नसल्याने या समाजाच्या प्रगतीचे पुढील सर्वच टप्पे कोसो दूर आहेत! म्हणून आजघडीला किमान या पहिल्या टप्प्याच्या बाबतीत ठोस निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे.
तरी, मुस्लिम समाजाला तुर्तास किमान ५% शैक्षणिक आरक्षण तात्काळ लागू करण्यात यावे यासंबंधीचे निवेदन
शेख यासिन शेख बिबन (सामाजिक कार्यकर्ता), सामाजिक कार्यकर्ते आवेस अन्सारी, शेख युनुस ( पापूलर )अब्दुल सत्तार, काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष शेख हारुन दालवाले,,शेख रशिद, पत्रकार शेख समीरोद्दीन,शेख मुनवर, शेख युसुफ (गुत्तेदार), शेख फेरोज, शेख मोहसीन, पत्रकार अब्दुल जाफर, अस्ल़म बाबा, सय्यद़ अनिस, आदींनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपविभागीय अधिकारी मार्फत दिले आहे









