वसमत (इसाक पठाण)
कंत्राटी नोकर भर्ती विरोधात व विविध मागण्यासाठी विघार्थ्यानी
वसमतच्या उपविभागीय कार्याल्यासमोर गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी समर्थनार्थ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी धरण आंदोलन केले.
वसमत येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर विघार्थी आमरण उपोषणाला बसले आहेत यात प्रामुख्याने कंत्राटी भरती बंद करा, परीक्षा फिस वाढलेली कमी करण्यात यावी, कोरोना काळात ज्यांचे आई वडीलांचे मृत्यु झालेल्या मुला मुलींना मोफत शिक्षण द्यावे, पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर कडक कार्यवाई करावी, वसमत येथे पोलीस भरती व इतर भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थांसाठी ग्राऊंड उपलब्ध करून द्यावे. अशा विविध मागण्याचा समावेश आहे आमरण उपोषणाला बसलेल्या विघार्थ्याना पाठिंबा देण्यासाठी समर्थनार्थ महाविद्यालयीन विद्यार्थी सरसावले असून शनिवार दिनांक 7 आक्टोबर रोजी विघार्थ्यानी उपविभागीय कायालयासमोर धरणे आंदोलन केले जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन असेच चालु राहणार असल्याचे विघार्थ्यानी सांगीतले.
यावेळी शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .विघार्थ्याच्या या उपोषणाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे









