बदनापूर
बदनापूर शहरापासून काही अंतरावर असलेल्या शेत वस्ती मधील अज्ञात दरोदेखोरांनी रात्री उशिरा एका घरावर हल्ला करून त्या घरातील महिला, पुरुषांना मारहाण करीत दोन ते तीन लाखाचे वस्तू, रक्कम लुटून नेल्याची घटना घडली असून, घटनेची माहिती बदनापूर पोलिसांना देऊन देखील सकाळी 10वाजेपर्यंत पंचनामा करण्यासाठी पोलीस घटनास्थळी आले नव्हते त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून रात्रीच्या गस्त वर असलेले पोलीस कुठे होते असा प्रश्न देखील नागरिकांतून विचारला जात आहे, या घटनेत तीन जणांस मारहाण झाल्याने ते जखमी असून प्राथमिक उपचार करण्यात आले.
बदनापूर शहरात व तालुक्यात मागील काही महिन्यापासून चोऱ्या, दरोडे या घटनात वाढ़ झालेली आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी एका किरकोळ चोरीतून मोठे गुन्हे उघडकीस आले त्याचे झाले कि एका कर्मचाऱ्याच्या मुलाची घड्याळ चोरण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातून एका पोलीस कर्मचाऱ्याने सदर घटना वरिष्ठान्ना सांगितली असता शहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश पवार, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब खार्डे यांनी एकाला पोलीस खाक्या दाखवताच शहरात चोरी झालेल्या मोटारसायकल, काही दरोडे आदिची माहिती समोर आली त्यातून जवळपास, पंधरा ते वीस जणांस पोलिसांनी ताब्यात घेतले आणि मग सुरु झाले राजकीय फोन आणि पोलिसांची उडाली तारांबळ, शेवटी पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांनी ठाण्याचे इन्चार्ज म्हणून सूत्रे हातात घेतली आणि चार जणांना आरोपी करून इतर आरोपीना सोडून दिले, उत्तर आले आम्ही त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, जे उत्तर हसायस्पद असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत असून चोरी करणे, चोरीचा माल खरेदी करणे हे दोघे आरोपी असतात दोघांना कायदा असतांना बदनापूर पोलीस निरीक्षकासमोर कायद्याला महत्व नसल्याची जोरदार चर्चा होत आहे.
वरील गुन्हे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी स्वतःची पाठ थापटून घेतली व आम्ही खूप मोठी कामगिरी बजावल्याचे दाखवत पोलीस निरीक्षकांनी काही लोकांना हाताशी धरून प्रसिद्धी मिळविली मात्र खरे कामगिरी बजावणारे बाजूलाच राहिल्याचे दाबक्या आवजात बोलले जात आहे, दरम्यान 8ऑक्टोबर रोजी मध्यरात्री बदनापूर शहरापासून काही अंतरंवार शेत वस्ती आहे या वस्तीवरील एका घरावर दरोदेखोरांनी हल्ला करीत घरातील महिला, पुरुषांना बबेदम मारहाण करीत रोख रक्कम व इतर वस्तू असे दोन ते तीन लाखाची लूटमार केली, सदर घटना घडल्यानंतर बदनापूर पोलिसांना माहिती देण्यात आली मात्र सकाळी दहा वाजेपर्यंत पोलीस पंचनामा करण्यासाठी आलेच नव्हते, शेवटी एल सी बी पोलीस निरीक्षक रामेश्वर खाणाळ हे आले आणि त्यांच्या सोबत पोलीस पण पोहचले, पंचनामा सुरु असून आता बदनापूर पोलीस त्या दरोदेखोरांचा शोध लावण्यात यशस्वी होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.









