वसमत (इसाक पठाण)
ऐन दिवाळीत सरकार वसमत तालूका दुष्काळाग्रत जाहीर करुन शेतकऱ्यांना दिवाळीची भेट द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे
अपुऱ्या पावसामुळे व सोयाबीन पिकावर पडलेल्या रोगामुळे सोयाबीनचा खर्च ही निघाला नाही तसेच कापसाला पांच दहा बोंडे लागून पहिल्याच वेचणीत कापूस संपणार आहे हळदीला रोगराईने ग्रासले आहे एकंदरीत
यावर्षीचा खरिप हंगाम हाताशी गेल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे त्यामुळे त्यांची दिवाळी अंधारात साजरी होत आहे तसेच पर्याप्त प्रमाणात पाऊस न झाल्याने व परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने जमिनीत वल नसल्याने रब्बीतील हरभरा, ज्वारी इत्यादी पिकांची पेरणी झाली नाही त्यामुळे रब्बी हंगामाचे ही काही खरे नसल्याने शेतकऱ्यांची चांगलीच अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे राज्य सरकारने वसमत तालुका दुष्काळाग्रस्त जाहीर करावे अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे व या मागणीसाठी वसमत विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजू नवघरे यांनी पुढाकार घ्यावा व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशीही मागणी शेतकऱ्यांतून होत आहे









