लोणार. प्रा मो लुकमान कुरैशी
जिल्हा विशेष प्रतिनिधी बुलडाणा
लोणार तालुका भारतीय जनता पार्टी चे निष्ठावान कार्यकर्ते इमान इतबारे उत्कृष्ट प्रकारे काम गिरी बजवणारे जेव्हां लोणार तालुक्यातकोणीही ग्रामीण भागात भारतीय जनता पार्टी चे काम करण्या साठी लोक पुढे येत ना होते अशय परस्ती मध्ये प्रकाश नागरे व यांच्या सहकार्याने बीजेपी चे झेंडे हातात घेऊन संपूर्ण लोणार तालुकयात काम करत होते. लोक झेंडे हातात घेण्यास तयार होत ना होते झेंडा घेण्यात नाकारत होते तेंव्हा केंद्रात तर सोडा पण राज्यात सुध्दा बीजेपी ची सुध्दा सरकार नव्हती, त्यावेळी BJP पक्षात प्रवेश घेऊन त्यात प्रामाणिक पणे काम करत पक्षाला गती देऊन संघटन मजबूत करण्याचे काम प्रकाश नागरे आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून करत होते.अशया निष्ठा वान कार्यकर्ता कडे जर बीजेपी पाठ फिरवत असेल तर लोणार तालुक्याचे 70%भारतीय जनता पार्टी चे सदस्य प्रकाश नागरे सोबत असण्याची शक्यता नाकारता येत नाही का? प्रकाश नागरे म्हणाले की जिथे काम करणाऱ्यांची कदर नाही त्या पक्षात कार्यकर्ते काय काम करणार भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस या पदावर काम करणारे प्रकाश नागरे यांनी नाराजी व्यक्त करत वरीष्ठ पातळी वरील नेत्याचे मत आता आपल्याशी मिळत नाही तर पक्षाला स्पष्ट पणे बोलणारा कार्यकर्ता जर चालत नसेल तर अश्या पक्षात काम करण्यास काहीच फायदा नाही असे मला वाटते! दुसर्या पक्षातून आलेल्यांना महत्त्वाचे पद आणि सुरूवाती पासुन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना वार्यावर सोडून चुकीच्या पद्धतीने व नवीन व्यक्तीलापक्षात योग्य पद मिळत असून, जुने कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्यामुळे मी माझ्या सहकार्य सह पक्षाला राम राम करीत आहेत! स्थानीक पातळीवर पक्षात लोकांसमोर आपली बाजू मजबुतीने माडण्यात नेते कमी पळत असून अगामी प्रत्येक निवडणुकीत व ग्रामपंचायत सारख्या निवडणुकात निष्ठावंत पने काम करण्यास कोण कोण कमी पळले त्याचा विचार मथन करण्याची गरज असताना कार्यकर्ताना नाराजकरण्याचे सत्र सुरु आहे.सध्या अनेक कार्यकर्त्यांनी प्रकाश नागरे सोबत बीजेपी सोडून भारतीय राष्ट्र समिती (BRS ) मध्ये प्रवेश केला आहे नगरे म्हणाले की येणाऱ्या काळात 70%कार्यकर्ते बीआर एस मध्ये प्रवेश करतील प्रकाश नागरे यांनी प्रत्येक छोट्या छोट्या गावात कार्यकर्त्यांची एक मोठी फळी उभी केलेली आहेत. ते सर्व कार्यकर्ते पदाधिकारी प्रकाश नागरे सोबत आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. अनेक कार्यकर्ते बीजेपी सोडण्याच्या तयारीत दिसत असल्या चे चित्र दिसत आहे व प्रत्येक कार्यकरत्यांचे वेगवेगळ्या मत समोर येत असल्याचे चित्र दिसून येत आहेत लोणार तालुक्यात बीजेपी ला मोठी खिंडार पाडले असे मत प्रकाश नागरेनीं व्यक्त केले आहे. जिल्हा अध्यक्ष भैय्या साहेब पाटील यांच्या वर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टी लोणार चे तालुका सरचिटणीस प्रकाश नागरे यांनी BJP सोडून BRS मध्ये प्रवेश केला असून त्यांच्या सोबात , अमोल पसरटे,पंढरी मापारी,विजय महाजन ,सुनिल रेड्डी ,तारामती जायभाये यांनी जाहीर प्रवेश केले..








