तेलंगानाच्या दोन विधानसभेचे प्रभारीपदी नियुक्ती
वसमत (इसाक पठाण)
तेलंगणा विधानसभा निवडणुकीत ज्युबली हिल विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार माजी क्रिकेटपटू महमद अझरोद्दीन निवडणूक मैदानात असून त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी वसमतचे माजी नगराध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अ हफीज अ रहेमान यांना प्रभारी नियुक्त करून त्यांच्या खांद्यावर पक्ष श्रेष्ठीने टाकली असून तसेच निजामाबाद शहर विधानसभा मतदारसंघासाठी सुद्धा त्यांची प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे
तेलंगाना येथे 30 नोव्हेंबर रोजी विधानसभेची निवडणूक होत आहे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून तेलंगणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी तेलंगणातील निजामाबाद(शहर) विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार शब्बीर अली आणि हैदराबाद येथील व्हिआयपी असलेली जुबली हिल्स विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार मोहम्मद अझरुद्दीन या दोन्ही विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून अब्दुल हफिज यांची नियुक्ती केली आहे
तेलंगणा विधानसभा निवडणुका काँग्रेस पक्षासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे तुमचा अनुभव लक्षात घेऊन ज्युबली हिल्स विधानसभा मतदारसंघात त्वरित पोहोचा आणि तुमच्या अनुभवानुसार काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या बाजूने प्रचार करून विजयश्री मिळवण्यात हातभार लावण्याचे नियक्ती पत्रात सुचित करण्यात आले आहे
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे अत्यंत विश्वासू असलेले अब्दुल हफिज यांनी या पूर्वीही अनेक राज्यात विधानसभा प्रभारी म्हणून काम पाहिले असून दिलेली जबाबदारी योग्यपणे पार पाडल्याने पक्षश्रेष्ठीने त्यांना या वेळी दोन विधानसभेचा प्रभारी करत मोठी जबाबदारी सोपवली आहे








