लोणार. प्रा मो लुकमान कुरैशी
लोणारी नगरपालिका मुख्याधिकारी व अग्निशमन विभागाच्या जबाबदारांवर कडक कारवाई करा नसता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडू असा इशारा शिवसेना उबाठा चे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे यांनी तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना दिला.
१४ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री ११ वाजता लोणार बस स्टॅन्ड मागील दुकानांना आग लावून गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे यामध्ये चार ते पाच दुकानात जळून खाक झाल्या सदरील स्पोर्ट रात्री झाल्याकारणाने जीवित हानी तळली लोणार नगरपालिकेच्या अग्निशमन यंत्रणेस फोन केला असता, अग्निशमनच्या गाडीत बॅटरी नव्हती, अग्निशमन च्या गाडीमध्ये पाणी भरलेले नव्हते, असे असताना दिखावा करण्यासाठी दुसऱ्या गाडीची बॅटरी टाकून अग्निशमन च्या गाडीत टाकून बिनापाणी रिकामी गाडी घटनास्थळी आली त्या गाडीचा उपयोग अग्निशमन साठी झाला नाही व दुकाना जळून खाक झाल्या त्यानंतर मेहकर विभागाची अग्निशमनाची गाडी आली यावरून लोणार नगरपालिकेच्या ढिसाळ कारभार पुढे आला करिता नगरपालिकेच्या मुख्याधिकारी व अग्निशमन च्या जबाबदार व्यक्तींवर योग्य ती कारवाई जिल्हा प्रशासनाने करावी जर कारवाई केली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी असा इशारा शिवसेना उभाठा जिल्हा संघटक डॉ.गोपाल बछिरे यांनी तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना दिला
याप्रसंगी
प्रा.डॉ.गोपालसिंह बछिरे यांच्या सह ॲड.दीपक मापारी, गजानन जाधव सर कैलास अंभोरे, सुदन अंभोरे सर, शाम राऊत, तानाजी मापारी लूकमान कुरेशी इकबाल कुरेशी,राजूभाऊ बुधवत, असरुबा धारकर,यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते








