लोणार/प्रा मो लुकमान कुरैशी
लोणार तालुक्यात व परिसरात दुष्काळ जाहीर झालेला आहे.शेतकऱ्यांचे खरिपाचे पिके पाण्याअभावी गेलेले असून काही प्रमाणात शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे त्या पाण्याच्या व विजेच्या भरोशावर शेतात पेरलेल्या तुरीला व इतर रब्बी पिकांना पाणी देऊन विस्कटलेली घडी बसवण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत.शेतकऱ्यांना दिवसा लाईन देण्याची आश्वासन असताना सुद्धा शेतकऱ्यांना किमान आठ तास लाईन देणे गरजेचे आहे.परंतु असे न करता शेतकऱ्यांना वारंवार विजेचा तुटवडा निर्माण करून शेतात तोंडाशी आलेले पीक सुकण्याच्या मार्गावर आहेत.
अशाच प्रकारे लोणार तालुक्यातील जांबुळ,पिंपळनेर व देऊळगाव वायसा या परिसरात मागील सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांना दररोज एक ते दीड तास दिल्या जात आहे.या मिळणाऱ्या विजेपासून शेतकऱ्यांना शेतामध्ये पिकांना पाणीपुरवठा कसा करायचा हा मोठा प्रश्न शेतकऱ्या समोर आहे.यासाठी शेतकऱ्यांनी वीज पुरवठा व्यवस्थित करून शेतीसाठी किमान सहा तास लाईन द्यावी,या मागणीसाठी शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालय लोणार याठिकाणी निवेदन देऊन आंदोलन केले.शेतकऱ्यांच्या विजेच्या मागणीला प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्यास महावितरण कार्यालयाला समोर अमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी तिंनही गावचे सरपंचासह अन्य शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.








