वसमत/ इसाक पठाण
वसमत शहरातील कारखाना रोडवर छत्रपती चौक मारोती मंदिरा समोर मुस्लिम बांधवांचा वसमत-पुर्णा तालुक्याचा दोन दिवसीय उमुमी इज्तेमा
आयोजित करण्यात आला होता.
यासाठी हजारो मुस्लिम समाज बांधव या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सकल मराठा समाज वसमतच्या वतीने इज्तेमाला आलेल्या मुस्लिम बांधवांना पाणी वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता
शनिवार दिनांक 25 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 1-00 वाजता कारखाना रोडवरील इज्तेमा कार्यक्रमाच्या ठिकाणी पाणी वाटप करुन मराठा समाजाने एकतेचा संदेश दिला.
यावेळी मोठ्या संख्येने सकल मराठा बांधव उपस्थित होते .









