फलटण / अमिर शेख
तालुक्यातील नामांकित वकिलांची भारत सरकार यांच्यामार्फत नोटरी म्हणून निवड झाल्याबद्दल फलटण तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने नोटरी म्हणून निवड झालेल्या सर्व वकिलांचे समाजाच्या वतीने. सत्कार करण्यात आला.. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जमशेदभाई पठाण यांनी केले त्यांनी सांगताना असे सांगितले की गेले 50 वर्ष मुस्लिम समाजात समाजातील वकिलांना नोटरी पद मिळालेले नाही ते आज रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये फलटण मधील मुस्लिम समाजातील सात वकिलांना भारत सरकार नोटरी मध्ये निवड झाली याबद्दल समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे तसेच एडवोकेट जावेद भाई मेटकरी यांनी फलटण वकील संघाचे अध्यक्ष पद भूषविले होते त्यावेळी त्यांच्या कारकिर्दीमध्ये क्लिप कार्यक्रम हा झाला होता तसेच आज एडवोकेट अजित पठाण हे वकील संघाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या कारकीर्दीमध्ये फलटणमध्ये जिल्ह्याचं न्यायालय झालं त्याचं उद्घाटन झालं आहे सामाजिक कार्यकर्ते आमिर भाई शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना निवड झालेल्यांचे अभिनंदन करत खऱ्या अर्थाने नोटरी पदी निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला भारत सरकार नोटरी या पदी फलटणमधील निवड झालेले पैकी ऍड जावेद भाई मेटकरी एडवोकेट अजित पठाण दस्तगीर शेख मुराद इनामदार इम्रान तांबोळी समीर शेख यास्मिन मेटकरी यांची निवड झाल्याबद्दल मुस्लिम समाजातर्फे त्यांचा पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला यावेळी मेहबूब भाई मेटकरी पप्पू भाई शेख अमीर भाई शेख सलीम मेटकरी रफिक शेख सर जावेद भाई शेख रज्जू भाई बागवान आसिफ भाई मजे खान मेटकरी सर शेख शाकीरभाई महात सलीम तांबोळी मुबारक भाई मेटकरी हमीद भाई शेख शाहरुख शेख आरिफ भाई शेख बहुसंख्येने मुस्लिम समाजातील मान्यवर उपस्थित होते शेवटी जमशेद भाई पठाण यांनी सर्वांचे आभार मानून व कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले









