फलटण / अमिर शेख
श्री स्वामी समर्थ महाराजांचा 168 वा प्रकट दिन निमित्ताने श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, बुधवार पेठ,शिवाजी रोड फलटणच्यावतीने नवलबाई मंगल कार्यालय येथे प पूज्य राजनकाका देशमुख महाराज यांचे उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये हजारो भक्तांची उपस्थिती होती.
श्री स्वामी प्रकटदिनी नवलबाई मंगल कार्यालय,फलटण येथे सकाळी 8 वा श्रीं चा अभिषेक, महाआरती, मंत्र ,नामस्मरण त्यानंतर वास्तुशास्त्र,पितृषास्त्र,संख्याशास्त्र,शिवसरोदय शास्त्र याविषयी प. पू. राजनकाका देशमुखमहाराज यांचे प्रवचन झाले.
यावेळी व्यसन मुक्त संघटनेचे प्रमुख नातेपुते येथील ह भ प धैर्यशीलभाऊ देशमुख उपस्थित होते.
स्वामी जयंती निमित्त सकाळी विशेष अभिषेक,पूजा परमपूज्य काकांचे पुत्र राहुल देशमुख आणि त्यांच्या पत्नी सौ मेघा यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी बोलताना धैर्यशीलभाऊ देशमुख यांनी परमपूज्य राजनकाका देशमुख हे समाज आणि धार्मिक प्रबोधनाचे काम प्रामाणिकपणे करीत आहेत.परमेश्वराची सेवा करण्यासाठी कोणतीही वेळ अशुभ नसते सतत नामस्मरण करत राहिल्यास आपल्याला निश्चितच फल प्राप्ती मिळू शकते. नामा मध्ये मोठी ताकत आहे.आई वडील आणि मोठ्या थोरांचा आदर राखणे गरजेचे आहे असे धैर्यशीलभाऊ देशमुख मार्गदर्शन करताना सांगितले.
यावेळी बोलताना परमपूज्य राजन काका देशमुख महाराज यांनी दैनंदिन नित्य जीवन जगताना काय काय करावे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले आई-वडील हे सर्वात मोठे गुरु असून त्यांची सेवा म्हणजे परमेश्वर सेवा आहे त्यामुळे त्यांना दुखावू नका.स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना नेहमी भक्ती भावाचा मार्ग दाखविला कोणाला दुखावू नका असे सांगितले त्यांनी सांगितलेल्या मार्गावर भक्तांनी मार्गक्रमण करावे असे आवाहन परमपूज्य राजनकाका यांनी सांगितले.
सायकाळी 6.00 वा आरती व नंतर महाप्रसाद कार्यक्रम झाला. यावेळी विविध सेवेकरी भक्तांचा सत्कार करून राजनकाका देशमुख महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या सेवेकरांचे मोठे योगदान लाभले.
स्वामी सेवेकरी शिवानी नाईक निंबाळकर आणि त्यांच्या टिमने यावेळी स्टेज,वर आकर्षक अशी सजावट केली होती. त्यांनी 56 प्रकारचे विविध पदार्थ बनविले होते त्याचा नैवेद्य स्वामीना दाखविण्यात आला.









