सांगवी: अमिर शेख
फलटण तालुक्यातील सांगवी ग्रामपंचायत असलेल्या शासकीय गायरान जमिनीवर केलेले अवैध अतिक्रमण तात्काळ हटवावे, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते निलेश जगताप यांनी प्रजासत्ताक दिन आत्मदहनाचा इशारा दिला आहे .
सांगवी येथील गायरान जमिनीवर गट 284/१. या ठिकाणी जागेवर काही लोकांनी कुठलीही पूर्वपरवानगी न घेता, रात्रीतून अतिक्रमण करीत झोपड्या उभारल्या आहेत. याची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी जगताप यांनी ग्रामपंचायत सांगवी सरपंच तहसीलदार प्रांताधिकारी यांना निवेदनाद्वारे दिली असून आठ दिवसांमध्ये सदरचे अतिक्रमण न काढल्यास प्रजासत्ताक दिन तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा जगताप यांनी दिला आहे








