तुकाराम राठोड
प्रतिनिधी/जालना-
वाघ्रूळ या केंद्रामधील जि प प्रा शा उर्दू वाघ्रूळ या शाळेचे मुख्याध्यापक जमील शेख हे नियत वयोमानाप्रमाणे 30 जून 2024 रोजी सेवानिवृत्त झाले त्यामुळे के प्रा शा वाघ्रूळ व अंतर्गत सर्व शिक्षकांनी त्यांचा सपत्निक शाल श्रीफळ व भेट वस्तु देऊन सन्मान केला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी के प्रा शा वाघ्रूळचे केंद्रप्रमुख श्री अशोक इंगळे सर तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मुख्याध्यापक श्रीमान विजय चित्ते सर , उच्च श्रेणी मुख्याध्यापक रामकुमार खांडेभराड , दादाराव वाघ हे उपस्थित होते. यावेळी केंद्रांतर्गत बदली होऊन आलेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला यामध्ये बोडखे सर प्रा शा गोंदेगाव, मनेश खरात सर, श्रीमती रेपाळे मॅडम ,आणि श्री पाटील सर यांचा सत्कार करण्यात आला तर के प्रा शा वाघ्रूळ येथून पदोन्नती होऊन गेलेले श्रीमान गीते सर, श्रीमान कोल्हे सर ,श्रीमान बारगजे सर , या सर्वांना भेटवस्तू, शाल व पुष्पहार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी विजय चित्ते सर यांनी प्रास्ताविक केले श्रीमती मंजुषा खरात ,श्रीमती जोशी मॅडम ,श्री प्रमोद पवार सर, श्री बारगजे सर ,श्री पुजारी सर, श्री मांटे सर यांनी यावेळी जमील शेख सर यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल माहिती दिली. जमील शेख सर यांनी आपल्या सेवा काळातील अनेक आठवणी यावेळी सांगितल्या .अध्यक्षीय समारोप केंद्रप्रमुख श्री अशोक इंगळे सर यांनी तर सूत्रसंचालन श्री प्रमोद नाईक सर व श्रीमती मंजुषा खरात मॅडम यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी के प्रा शा वाघ्रूळ येथील सर्व शिक्षकांनी परिश्रम केले.









