वसमत (इसाक पठाण)
रामगिरी महाराज यांनी हजरत मुहम्मद पैगंबर सल्लम यांच्या विषयी अपशब्द वापरुन समस्त मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक कारवाई करण्याची मागणी येथील मुस्लिम समाजाने केली आहे
रामगिरी महाराज यांनी हजरत मुहम्मद सल्लम यांच्या विरोधात अपशब्दाचा वापर करून अपमान केला आहे या विरोधात मुस्लिम समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेच्या निषेधार्थ शहरातील शेकडो मुस्लिम समाजाच्या लोकांनी शहर पोलिस ठाण्यात ठाण मांडून धार्मिक भावना दुखवणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पोलिस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे यांना तक्रार दिली
यावेळी मौलाना फारुख, अड शेख मोहसीन, इरफान पठाण, सरफराज फारुकी,सैफोद्दीन काजी, शेख मुदस्सीर यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते








