• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

शाळेतील चिमुकल्या विघार्थीनींनी पोलिसा सोबत केला रक्षाबंधन सण साजरा

गावमत by गावमत
August 19, 2024
in महाराष्ट्र
0
शाळेतील चिमुकल्या विघार्थीनींनी पोलिसा सोबत केला रक्षाबंधन सण साजरा
0
SHARES
236
VIEWS


वसमत (इसाक पठाण)
शहरातील लालबहादूर शास्त्री (एल.बी.एस) शाळेतील चिमुकल्या विघार्थीनींनी स्वतः तयार केलेल्या राख्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बांधून रक्षाबंधन सण साजरा केला
बहिण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन.
मात्र सदैव ‘ऑन ड्युटी’ असलेल्या सैन्य दलातील जवान आणि पोलिस कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनासह इतर सण साजरा करता येत नाही. त्यामुळे सोमवार १९ आगस्ट रोजी रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून वसमत येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या चिमुकल्या विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष वसमत पोलिस ठाण्यात जाऊन पोलिस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे आणि इतर कर्मचाऱ्यांना राख्या बांधून हा पवित्र सण साजरा केला. शहर पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी देखील ओवाळणी म्हणून त्यांच्या रक्षणाची जबाबदारी घेत अडचणीच्या वेळेस तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले.

आपत्कालीन परिस्थिती नियंत्रित आणण्यासाठी अहोरात्र झटणारे आणि कायदा – सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांना वेळेचे बंधन नसते. समाजासाठी आपल्या भूमिका बजावताना अनेकदा पोलिसांना आपल्या कुटुंबियांना वेळ देणे शक्य होत नाही. अनेक सणवार त्यांना कुटुंबियांसोबत साजरे देखील करता येत नाहीत. दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी अनेक पोलिस गावाकडे असलेल्या बहिणीला भेटून सण साजरा करू शकत नाहीत, त्यामुळे यंदा हा सण पोलिसांसोबत साजरा करावा, अशी संकल्पना लाल बहादूर शास्त्री विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी मांडली.
आज सकाळी आकरा वाजता प्राचार्य प्रमोद डोंबे व प्राचार्य सचिन लाटकर यांनी विद्यार्थिनी आणि शिक्षिकांसह पोलिस ठाणे गाठले. यावेळी विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या राख्या पोलिस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे (शहरी विभाग) सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री बालाजी महाजन(ग्रामीण विभाग) तसेच इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बांधल्या. रस्त्यावर वाहतूक नियंत्रित करण्याऱ्या वाहतूक पोलिसांना देखील राखी बांधून ओवाळले. चिमुकल्या विद्यार्थिनींनी राखी बांधल्याने सर्वच पोलिस कर्मचारी आणि अधिकारी भारावले होते. शाळेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी पोलिस स्टेशन वसमत शहरचे पोलिस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे, सहायक पोलिस उपनिरीक्षक केंद्रे, पोलिस अमलदार वाघमारे, गारोळे, माहत्रे, चव्हाण, दळवी, जोंधळे, कदम, मुकाडे,
त्याच बरोबर वसमत ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन, पीएसआय एस.एम मुपडे,पोलीस हवालदार विश्वनाथ खंदारे, नामदेव बेंगाळ, साहेबराव चव्हाण, जयकुमार वराडे.आदी कर्मचारी , शिक्षक, विघार्थीनी यावेळी उपस्थित होते.

Related Posts

महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले

April 7, 2026
दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
महाराष्ट्र

दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

September 29, 2025
विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल
महाराष्ट्र

विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल

July 31, 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार
महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार

June 14, 2025
शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..
महाराष्ट्र

शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..

June 7, 2025
महाराष्ट्र

वाहनांना ‘एचएसआरपी’ नाही; मग’आरटीओ’तील कामे विसरा !२०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी बंधनकारक : नंबर प्लेटसाठी ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य

June 7, 2025
Next Post
हयातनगर व वसमत शहरातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार पक्षात केला प्रवेश

हयातनगर व वसमत शहरातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार पक्षात केला प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In