फलटण / अमिर शेख
सांगवी तालुका फलटण येथील गट नंबर 281 /1 या शासकीय मालकीच्या गायरान जमिनीवर झालेल अतिक्रमण त्वरित हटवण्यात यावे या मागणीसाठी येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश जगताप यांनी स्वातंत्र्यदिना दिवशी फलटण तहसील कार्यालय समोर उपोषण सुरू केले होते जगताप यांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गावातील व गावाबाहेरील इसमांनी गावातील काही गावगुंडांना हाताशी धरून ग्रामपंचायत च्या कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय स्वतःच्या आर्थिक फायदा करता शासकीय मालकी असणाऱ्या जमिनीची परस्पर विक्री करून खूप मोठे प्रमाणात कच्चे व पक्के बांधकाम करून अतिक्रमण केले आहे सदरचे गायरान क्षेत्र हे शासनाने जनावरांच्या चाऱ्यासाठी राखीव ठेवले आहे त्यामुळे त्यावर बेकायदेशीरपणे करण्यात आलेले अतिक्रमण त्वरित काढून सदरची जागा ही मोकळी करून घ्यावी या प्रमुख मागणीसाठी निलेश जगताप यांनी उपोषण केले होते दरम्यान तहसीलदार डॉ.अभिजीत जाधव यांनी समक्ष उपोषण स्थळी भेट देऊन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांना शासकीय जागेवर झालेल्या अतिक्रमणा बाबत त्वरित कारवाई करण्याच्या सूचना दिल्याने गटविकास अधिकारी यांनी चौकशी समिती नेमून 30 दिवसात कारवाई करण्याची लिके शासन दिल्याने निलेश जगताप यांनी आपले उपोषण स्थगित केले
या उपोषणाला मनसेचे उपजिल्हाध्यक्ष युवराज शिंदे तसेच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र बेडके शिवसेना महिला आघाडी यांनी पाठिंबा दिला








