• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपला जिल्हा

‘कसे सत्य सांगू, की मला माणसाची भीती वाटते रे..”श्रावण हिरवळ..कवितेचा दरवळ…’ ; अंजनी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित कवि संमेलन रंगले

गावमत by गावमत
August 25, 2024
in आपला जिल्हा
0
‘कसे सत्य सांगू, की मला माणसाची भीती वाटते रे..”श्रावण हिरवळ..कवितेचा दरवळ…’ ; अंजनी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित कवि संमेलन रंगले
0
SHARES
14
VIEWS

जालना / प्रतिनिधी

अंजनी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पोलीस उपनिरीक्षक बालाजी किरवले यांच्या मातोश्री स्व. अंजानी हौसाजी किरवले यांच्या 21 व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘श्रावण हिरवळ..कवितेचा दरवळ…’ हे निमंत्रितांचे कवि संमेलन बहारदार कवितांनी रंगले. एकापेक्षा एक सरस आणि तितक्याच आशयघन कवितांची बरसात झाल्यामुळे रसिक मंत्रमुग्ध झाले.
जालना शहरातील ब्राह्मण सभा भवनात गुरुवार, 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी ‘श्रावण हिरवळ..कवितेचा दरवळ…’ हे निमंत्रितांचे बहारदार कविसंमेलन पार पडले. या संमेलनाचे उदघाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव न्यायाधीश श्रीमती भालसाकडे वाघ यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस उपनिरीक्षक बालाजी किरवले होते. यावेळी ज्येष्ठ विधीतज्ञ ब्रह्मानंद चव्हाण, जीवरेखा नदी समन्वय एम.डी.सरोदे, ओम हॉस्पिटलचे अर्जुन वाहुळे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.


या ठिकाणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव भालसाकडे वाघ मॅडम यांनी मनोगत व्यक्त करताना महिलांचे हक्क कायदे व अधिकार या विषयी थोडक्यात माहिती दिली..
यावेळी कवि डॉ. सुहास सदावर्ते यांच्या
‘कसे सत्य सांगू, कसे काय भांडू,
की मला माणसाची भीती वाटते रे..’
या आणि कवि कैलास भाले यांनी सादर केलेल्या
‘पाऊस अवकाळी, विझवतो चूल
गळक्या घराला,अफूची भूल…’
या लघु कवितांना रसिकांना अंतर्मुख केले. डॉ. दिगंबर दाते यांनी सादर केलेली
‘आभाळात गेलेला बाप आणता येत नसतो परत…
असताना कुठे कळतो तो, नसताना बसतो झुरत…’ या कवितेने रसिकांची दाद मिळविली. तर गझलकार डॉ. राज रणधीर यांच्या लयबद्ध गझलेने मंत्रमुग्ध केले. कवि पत्रकार अच्युत मोरे स्त्रीभ्रूणहत्येवर भाष्य करणारी
‘उमलण्या आधीच कळी त्यांनी खुडून टाकली आहे..’ ही कविता सादर केली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक बालाजी किरवले यांनी हलाखीच्या परिस्थितीवर मार्मिक भाष्य करणारी
‘माझी परिस्थिती होती कमालीची बिकट,
कव्हा असायचे तेलमीठ नसायचे तिखट..’ ही कविता गायली.
कवि पत्रकार विनोद काळे यांनी राजकारणावर टिप्पणी करणारी ‘राजकारणाची पातळी’ ही कविता सादर केली.
कवयित्री ज्योती आडेकर यांनी ‘उठ नारी तू शस्त्र उठा’ ही चेतना जागवणारी कविता सादर केली. कवयित्री रेखा
गतखणे, छाया जायभाये, वैशाली फोके, अनिता पाठे त्याचबरोबर गझलकार सुनील लोणकर, डॉ. प्रभाकर शेळके, डॉ.अशोक खेडकर, गणेश खरात, कृष्णा कदम, मनिष पाटील, सुहास पोतदार, शिवाजी तेलंग, प्रा. पंढरीनाथ सारके,लक्ष्मीकांत दाभाडकर या कवींच्या बहारदार कवितांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी उद्घाटक
न्यायाधीश भारसाकडे वाघ यांनी महिलांना कायदेविषयक माहिती देऊन उद्योग क्षेत्रात उतुंग भरारी घेणाऱ्या उद्योगिनी महिलांना शुभेच्छा दिल्या. प्रस्ताविक ज्योती आडेकर यांनी केले.
सूत्रसंचालन मनीषा पाटील यांनी केले. विद्या जाधव यांनी आभार मानले.

उद्योगिनीचा सन्मान

यावेळी बचत गटाच्या माध्यमातून
उद्योगक्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या बचत गटाच्या महिलांचा अंजनी फाउंडेशनच्या वतीने ‘उद्योगिनी सन्मान – 2024’ हे मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विद्याज्योत टेक्निकल एज्युकेशन सेंटरमध्ये संगणकाचे 12 महिन्यांचे शिक्षण पूर्ण करणार्‍या वैष्णवी एशल, वैष्णवी बावणे या विद्यार्थ्यांना मोफत संगणक देण्यात आले. यावेळी
सामजिक संदेश देणार्‍या ‘फिक्र’ या शॉर्ट मूव्हीजच्या पोस्टरचे विमोचन करण्यात येऊन कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

Related Posts

बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार
आपला जिल्हा

बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

August 11, 2025
मांजरगाव येथील घटना दोन शाळकरी मुलांच्या भांडणातून ,कोणताही धार्मिक वाद नाही ,कायदा हातात घेणाऱ्या विरुद्ध कडक भूमिका घेतली जाईल -पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे
आपला जिल्हा

मांजरगाव येथील घटना दोन शाळकरी मुलांच्या भांडणातून ,कोणताही धार्मिक वाद नाही ,कायदा हातात घेणाऱ्या विरुद्ध कडक भूमिका घेतली जाईल -पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे

August 9, 2025
किरकोळ कारणावरून बाप, लेकाचा तीष्ण हत्याराने खून
आपला जिल्हा

किरकोळ कारणावरून बाप, लेकाचा तीष्ण हत्याराने खून

May 13, 2025
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते धनादेश वाटप!
आपला जिल्हा

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते धनादेश वाटप!

March 22, 2025
एकाच नंबर च्या दोन मोटारसायकल, प्रकार चोरीचा कि अन्य काही ?
आपला जिल्हा

एकाच नंबर च्या दोन मोटारसायकल, प्रकार चोरीचा कि अन्य काही ?

March 22, 2025
दगडवाडी येथील मोफत नेत्र तपासणी शिबिरात 188 रुग्णांची तपासणी
आपला जिल्हा

दगडवाडी येथील मोफत नेत्र तपासणी शिबिरात 188 रुग्णांची तपासणी

January 24, 2025
Next Post
बदनापूर येथे महाविकास आघाडी तर्फे महायुती सरकारचा निषेध!

बदनापूर येथे महाविकास आघाडी तर्फे महायुती सरकारचा निषेध!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In