वसमत (इसाक पठाण)
हिंगोली व परभणी या दोन जिल्ह्यांचा दोन दिवसीय तब्लीगी इज्तेमास परभणीत सुरुवात झाली आहे
प्रति वर्षा प्रमाणे याही वर्षी हिंगोली व परभणी जिल्ह्याचा दोन दिवसीय तब्लीगी इज्तेमा परभणी येथे १ जानेवारी २०२५ पासून सुरू झालेला आहे.
परभणी शहरातील जिंतूर रोड वर या इज्तेमाचे आयोजन करण्यात आले आहे इज्तेमा यशस्वी होण्यासाठी हिंगोली व परभणी जिल्ह्यातील जमात चे जिम्मेदार व मुस्लिम बांधव योग्य नियोजन करीत आहे भव्य शामियाना, भव्य मंच,वजूखाना बरोबरच हजारो साथीची बसण्याची व पाण्याची सोय करण्यात आली आहे तसेच नाममात्र दरात जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे
आज सकाळपासूनच दोन्ही जिल्ह्यांतील हजारों मुस्लिम बांधव या इज्तेमासाठी परभणी नगरीत येत आहे.
विविध मौलानांचे धार्मिक प्रवचन होत आहे
उघा दिनांक २ जानेवारी रोजी इज्तेमा स्थळी प्रसिध्द मौलाना यांचे धार्मिक प्रवचन होणार आहे तसेच सायंकाळी सामूहिक विवाह सोहळा पार पडणार आहे मगरीबच्या नमाज नंतर विश्व कल्याणासाठी सामूहिक दुआ केली जाणार असून त्यात लाखोंच्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित राहण्याची शक्यता आहे.तसेच या इज्तेमामधून शेकडो तरुण जमात मध्ये निघणार आहेत
या इज्तेमासाठी मुस्लिम तरुणांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे








