• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

प्रियसीचा खून करून प्रियकराने मृतदेह २०० किलो मीटर अंतरावर आणून फेकला,प्रियकर अटकेत पोलिस कोठडीत रवानगी

गावमत by गावमत
January 1, 2025
in महाराष्ट्र
0
दरवाजा का तोडला या कारणावरून एका तरुणाचा खून,चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
0
SHARES
380
VIEWS


वसमत (इसाक पठाण)
प्रियकराने आपल्या प्रियसीची गळा दाबून हत्या केली व पकडला जाऊ नये म्हणून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने घटनास्थळापासून २०० किलो मीटर अंतरावर तिचा मृतदेह आणून फेकला शेवटी हिंगोली पोलीसांच्या कुशलतेने तो पकडला गेला व त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली.
दिनांक २४ डिसेंबर रोजी औंढा नागनाथ पोलीसांना माहिती मिळाली की एक स्त्री जातीचा मृतदेह वगरवाडीच्या शिवारात पडलेला आहे याची माहिती मिळताच औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणेश राहिरे तात्काळ पथकास घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून मृतदेह सरकारी रुग्णालयात दाखल केले असता प्राथमिक वैद्यकीय अहवालात तिचा गळा दाबून खून झाल्याचे स्पष्ट झाले होते खून झाल्याचे उघडकीस आल्यानंतर
ही तरुणी कोण त्याची ओळख पटविणे आवश्यक होते.

ओळख पटल्यानंतरच आरोपी पर्यंत पोलिसाना पोहचणे सोपे होणार होते त्यामुळे तिची ओळख पटविण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात आले घटनास्थळाचा बारकाईने तपास केला असता या ठिकाणी डी मार्ट ची पावती मिळाली यावरून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली असता तिची ओळख पटली ती अलका बाजीराव बेंद्रे रा.जामखेड जिल्हा अहिल्याबाई होळकर नगर (अहमदनगर) असल्याचे तपासात निष्पन्न झाले मृतदेहाची ओळख पटल्यानंतर आता आरोपी कोण याचा तपास लावणे पोलिसांसमोर आव्हान होते.पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथके आरोपीच्या शोधासाठी पाठविण्यात आली होती शेवटी पोलिसांनी तेलंगणा येथील आदिलाबाद येथून आरोपी श्रीकांत सुरेश पिनलवार रा.मुगट ता.मुदखेड जिल्हा नांदेड यास अटक केली.


पोलिस तपासात असे उघडकीस आले की अलका व श्रीकांतचे प्रेम संबंध होते परंतु दोघात खटके उडू लागले होते या वादातून श्रीकांत ने छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथील लाडगाव येथे अलकाचा गळा दाबून खून केला व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह प्रवासी बॅगेत भरून २०० किलो मीटर अंतरावर असलेल्या वगरवाडी शिवारात आणून फेकला व तो पळून गेला होता
जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली ग्रामीण चे उपविभागीय पोलिस अधिकारी अंबादास भुसारे, जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील,सपोनि शिवसांब घेवारे, औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणेश राहिरे यांच्या पथकाने या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावली.

Related Posts

महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले

April 7, 2026
दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
महाराष्ट्र

दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

September 29, 2025
विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल
महाराष्ट्र

विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल

July 31, 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार
महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार

June 14, 2025
शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..
महाराष्ट्र

शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..

June 7, 2025
महाराष्ट्र

वाहनांना ‘एचएसआरपी’ नाही; मग’आरटीओ’तील कामे विसरा !२०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी बंधनकारक : नंबर प्लेटसाठी ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य

June 7, 2025
Next Post
15 जानेवारी रोजी प्रसिद्ध कव्वाल रईस अनीस साबरी यांचा भव्य कव्वाली चा कार्यक्रम

15 जानेवारी रोजी प्रसिद्ध कव्वाल रईस अनीस साबरी यांचा भव्य कव्वाली चा कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In