वसमत (इसाक पठाण)
आमदार महोत्सव -२०२५ निमित्त
जागतिक दर्जाचे सुप्रसिद्ध कव्वाल व सिने-गितकार
रईस अनीस साबरी यांचा कव्वाली व गझलचा भव्य कार्यक्रम संपन्न झाला यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते
वसमत येथील सय्यद इमरान अली वेलफेयर फाउंडेशनच्या वतीने बुधवार दिनांक.१५ जानेवारी रोजी वसमत येथील महोमद अली रोड मुस्कान फंक्शन हॉल समोरील मैदानावर सायंकाळी ७ वाजता भव्य कव्वाली व गजल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
वसमत विधानसभेचे आमदार राजूभैया नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली “आमदार महोत्सव २०२५” अंतर्गत राजूभैय्या नवघरे सेवा प्रतिष्ठाणचे संचालक, सामाजिक कार्यकर्ते महाऊर्जाचे अध्यक्ष सय्यद इमरान अली नासर अली यांच्या संकल्पनेतून सय्यद इमरान अली वेलफेयर फाउंडेशनच्या वतीने आयोजित भव्य दिव्य कव्वाली व गजल कार्यक्रमास
मराठवाड्यात पहिल्यांदाच जागतिक दर्जाचे सुप्रसिद्ध कव्वाल रईस अनिस साबरी आले होते
रईस अनिस साबरी यांनी
मेरे खाजा मोईन एक इशारा कर दे”
मेरे सर पे जो मेरी मा के दुआओ के साए है सफर मे भी यह कोई हादसा होने नही देते,
सांप डसे तो दोस्त बचाए , दोस्त डसे तो कौन बचाए, भारत जैसा कोई देश नही है,यासह भक्तीमय सुफीयाना कलाम, देशभक्तीपर कव्वाली तसेच गझल सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.
यावेळी विधानसभा निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी झालेले वसमतचे लोकप्रिय आमदार राजू नवघरे यांचा भव्य सत्कार करण्यात आला
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाउंडेशनचे अध्यक्ष महमद मोबीनदा, कार्याध्यक्ष दीपक पांडुरंग कातोरे,
उपाध्यक्ष एजाज रशीद शेख,सचिव पठाण मोहसीन खान,संचालक
खादर खदीर कुरेशी,
अर्शद अहमद खदीर, अहमद,शेख शफी शेख जमील,समद वहीद फारोखी,
मिन्हाज सिराज शेख,
माजिद इनामदार,
मुजफ्फर जफर सौदागर सह इमरान अली फाउंडेशनचे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले








