वसमत (इसाक पठाण)
वसमत येथे महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा महाराष्ट्र चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेस सुरुवात झाली असून ही स्पर्धा तीन दिवस चालणार आहे
हिंगोली जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने वसमत येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या भव्य मैदानावर ३ दिवसीय महाराष्ट्र आंतर जिल्हा महाराष्ट्र चॅम्पियन फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
शुक्रवार दिनांक १७ जानेवारी रोजी या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी तहसीलदार शारदा दळवी,माजी नगराध्यक्ष शिवदास बोड्डेवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ.गंगाधर काळे, हिंगोली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष मुनीर पटेल, माजी नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार,माजी नगर परिषद उपाध्यक्ष रियाज कुरैशी, महाऊर्जाचे अध्यक्ष सय्यद इमरान अली,माजी नगर परिषद उपाध्यक्ष सिताराम म्यानेवार, माजी नगरसेवक खालेद शाकेर,हिंगोली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव माजी नगरसेवक अजगर पटेल,सय्यद इसरार,अड. मोईज यांच्या सह फुटबॉल प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते
या स्पर्धेत हिंगोली, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, अहिल्या नगर(अहमदनगर) अकोला, सोलापूर,आदि जिल्ह्यानी फुटबॉल टीमनी भाग घेतला आहे. फुटबॉलपटूची जेवणाची व राहण्याची व्यवस्था असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे
रोमांचक सामने पाहण्यासाठी फुटबॉल प्रेमीची तोबा गर्दी मैदानावर पाहायला मिळत आहे.








