वसमत (इसाक पठाण)
मतदानाच्या पुर्वसंध्येला विधानसभा निवडणुकीतील लोक जनशक्ती पक्षाचे उमेदवार गुरूपादेशवर महाराज यांच्या गाडीवर दगडफेक करून त्यांना गंभीर जख्मी करणाऱ्या व गाडीचे नुकसान करणाऱ्या हल्लेखोरांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना मोठे यश आले असून दोन हल्लेखोराना अटक करण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीत गुरुपादेश्वर महाराजांना मतदारांची सहानुभूती मिळवण्यासाठी नांदेड येथील स्वामीच्या सांगण्यावरून त्यांनी हा हल्ला केल्याचे आरोपीनी कबूल केले आहे.
या बाबतीत अधिक माहिती अशी की वसमत विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या पुर्वसंध्येला लोकजनशक्ती पार्टीचे उमेदवार तथा तालुक्यातील गिरगाव मठाचे मठाधीपती गुरुपादेश्वर महाराज यांच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक करून जखमी केले होते त्यामुळे निवडणुकीला धार्मिक रंग येऊन वातावरण तणावपूर्ण बनले होते जमावाने एका विशेष धर्माच्या लोकांवर संशय व्यक्त करून हलेखोरांना ताबडतोब अटक करण्याची मागणी केली होती पोलिस ठाण्या समोर मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता या संदर्भात पो.स्टे. वसमत ग्रामीण येथे गुरनं. २८४/२०२४ कलम १२५, ३२४(४), ३(५) भा.न्या.सं. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता व पोलिस प्रशासनाने परिस्थिती योग्य पध्दतीने हाताळून वातावरण शांत केले होते नसता मतदानाच्या पुर्वसंध्येलाच शांतता बिघडली असती
ऐन मतदानाच्या पुर्वसंध्येला विधानसभा निवडणुक लढविणारे गुरुपादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक करून हल्ला होतो त्यात ते गंभीर जख्मी होतात त्यांना नांदेडला अडमिट करावे लागते त्यांच्या गाडीचे नुकसान होते हल्लेखोरां कडून त्यांच्या अंगावर व गाडीत हिरवा गुलाल टाकण्यात येतो. ही गंभीर बाब होती .हल्लोखोर कोण होते यामागे त्यांचा उद्देश काय होता याचा तपास लावणे पोलिसांसमोर आव्हान होते.महाराजावरील हल्ल्याचा सर्व स्तरावर निषेध करण्यात आला या गंभीर घटनेची चौकशी करून हलेखोरांना ताबडतोब अटक करण्याची मागणी लिंगायत समाज तसेच आमदार राजू नवघरे यांनी केली होती आमदार राजू नवघरे यांनी विधानसभेत आवाज उठविला होता गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेता सदर गुन्हयाचा प्राथमिक तपास पो.स्टे. वसमत ग्रामीण येथे केल्यानंतर सदर गुन्हा तात्काळ उघडकीस येण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सदर गुन्हयाचा तपास पो.नि. विकास पाटील, स्थानिक गुन्हे शाखा यांच्याकडे वर्ग केला होता. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक नेमुन सदर गुन्हयाचा तपास करण्यात येत होता.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळावरील पुरावे, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, गोपनिय बातमीदार व तांत्रिक बाबींचा बारकाईने अभ्यास करून सदर गुन्हयातील श्री गुरुपादेश्वर महाराज यांची गाडी फोडणारे आरोपी भुजंग माधवराव निरदोडे व संकेत भास्कर भोसले, दोन्ही रा. शिवराई नगर, मालेगाव रोड, नांदेड यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता आरोपीतांनी सांगीतले की, श्री गुरूपादेश्वर महाराज हे विधानसभा निवडणुकीस उभे राहिल्यामुळे त्यांना मतदारांची सहानुभुती मिळावी या उददेशाने आमच्या ओळखीचे स्वामी, रा. नांदेड यांच्या सांगण्यावरून श्री गुरुपादेश्वर महाराज यांची गाडी गिरगाव पाटी रोडवर फोडल्याचे सांगीतले. त्यावरून आरोपीतांना ताब्यात घेतले असुन सदर गुन्हयात आणखी काही आरोपींचा सहभाग आहे का याबाबत पुढील तपास सुरू आहे.
सदरची कामगिरी श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक हिंगोली, श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक हिंगोली, विकास पाटील, पो.नि. स्था.गु.शा. यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. चे सपोनि. शिवसांब घेवारे, पोउपनि. विक्रम विदुबोने, पोउपनि. कपील आगलावे पोलीस अंमलदार प्रेमदास चव्हाण, गजानन पोकळे, कुमार मगरे, राजु ठाकुर, लिंबाजी वाव्हळे, रविकुमार स्वामी, निरंजन नलवार, आकाश टापरे, हरिभाऊ गुंजकर, नरेंद्र साळवे, किशोर सावंत, विशाल खंडागळे, विठठल काळे, इरफान पठाण, प्रदिप झुंगरे यांनी केली.
पोलिसांनी सत्य उघडकीस आणल्यामुळे पोलिसांचे सर्व स्तरावर अभिनंदन व कौतुक केले जात आहे.








