वसमत (इसाक पठाण)
पुणे येथील चाकण येथे होणाऱ्या राज्यस्तरीय 3 दिवसीय इज्तेमासाठी नांदेडहून पुणे साठी विशेष रेल्वे गाडीची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी द.म. रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकाकडे केली आहे.
2 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी रोजी पुणे येथील चाकण मध्ये तीन दिवसीय राज्यस्तरीय इज्तेमाचे आयोजन करण्यात आले आहे या इज्तेमासाठी राज्य व देश पातळीवरील मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात येणार आहेत विशेषतः नांदेड हिंगोली परभणी लातूर व परिसरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने पुणे मार्गे चाकणला जाणार आहे त्यांना पुणे जाण्यासाठी रेल्वे हे सोयीचे माध्यम आहे म्हणून नांदेड ते पुणे विशेष रेल्वे गाडीची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी वसमतचे माजी नगराध्यक्ष अब्दुल हफीज अ.रहमान, माजी नगराध्यक्ष खलील अहमद, काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख अलिमोद्दीन, माजी नगर परिषद उपाध्यक्ष रियाज कुरैशी, माजी नगरसेवक मसरूर अहमद खान, माजी नगरसेवक खालेद शाकेर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष महमद अयुब पापुलर,माजी नगरसेवक नदीम सौदागर, माजी नगरसेवक शेख मोहसीन,शेख हारुण दालवाले,तौहीद अफजल,खलील बागवान,इरफान साबूनगर,शेख मुजीब सदर, रियाज पठाण,अ.सलीम बागवान,वसीम बागवान,रमीज अहमद आदिनी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना केली होती.खा.आष्टीरांनी यात लक्ष घालून नांदेड ते पुणे विशेष रेल्वे गाडीची व्यवस्था करण्यासाठी द.म.रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक यांना पत्र दिले आहे . विशेष रेल्वे गाडीची व्यवस्था झाल्यास मुस्लिम बांधवांना इज्तेमाला जाणे सोयीचे होणार आहे








