सीसीटीव्ही कॅमेरे ,इंटरनेट या सुविधा पुरवण्यात मोठा भष्ट्रचार
फलटण / अमिर शेख
शहरातील बंद सीसीटीव्ही कॅमेरांमुळे गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली असून शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू होणार तरी कधी असा प्रश्न आता शहरवासियांकडून उपस्थित केला जात आहे.
शहरात महिला व मुलींची छेडछाड, चेन स्नॅचिंग, पाकीट मार, चोरी यांसारख्या गुन्हेगारीला आळा बसावा तसेच अशा प्रकारच्या घटना घडल्यास गुन्हेगार शोधण्यास पोलिसांना सोपे व्हावे यासाठी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते.
हे कॅमेरे सुरू असताना शहरातील गुन्हेगारीत घट झाली होती. मात्र, गेल्या वर्षभरापासून हे कॅमेरे बंद अवस्थेत असल्यामुळे शहरात गुन्हेगारी वाढल आहे शहरातील बंद अवस्थेत असलेले सीसीटीव्ही कॅमेरे लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.







