प्रतिनिधी | बदनापूर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त 100 शिक्षक क्लब ऑफ जालना यांच्या वतीने शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा 2025 घेण्यात आलेल्या स्पर्धेत बदनापूर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात एम ए शारीरिक शिक्षण विषयात शिक्षण घेणाऱ्या ज्योती आनंद उदावंत यांचा पुणे विभागातून तृतीय क्रमांक आला असून नुकताच निकाल जाहीर करण्यात आला आहे.
जालना येथील 100 शिक्षक क्लब च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पुणे विभागातून बारामती येथील तुळजाराम चतुरचंद कनिष्ठ महाविद्यालयातील शारीरिक शिक्षिका ज्योती आनंद उदावंत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर -एक विद्यार्थी या विषयावर निबंध सादर केला होता, राज्यभरातून मोठया प्रमाणात स्पर्धेत सहभाग घेण्यात आला होता, नुकताच निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून या स्पर्धेत पुणे विभागातून ज्योती उदावंत यांचा तिसरा क्रमांक आला आहे.ज्योती उदावंत यांना पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.







