फलटण / अमिर शेख
केंद्र सरकारची ‘स्वच्छ भारत मिशन (शहरी)’ योजना कोमात?फलटण शहरांमध्ये स्वच्छता गृहांची समस्या एक गंभीर मुद्दा आहे. अनेक दिवसा पासून शहरांमध्ये, विशेषत: शंकर मार्केट ,गजानन चौक डेक्कन चौक, रिंग रोड,मलठण अनेक लोक वस्तीत, स्वच्छतागृहांंची कमतरता तर काही ठिकाणी उपलब्ध नाही ,यामुळे लोकांना उघड्यावर शौचास जावे लागते, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढतात, तसेच सार्वजनिक स्वच्छता आणि पर्यावरणावरही वाईट परिणाम होतोकाही राजकीय लोकांचा दबावमुळे काही ठिकाणी उपलब्ध असणारे स्वच्छतागृह जमीनदोस्त करण्यात आली.या मध्ये विशेष करून महिला, वय वृद्ध यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
प्रशासनाने विशेष बाब म्हणून त्वरित शहरात व्यवस्था करावी अशी मागणी लोकांन मधून होत आहे.शहरांमध्ये स्वच्छतागृहांची समस्या गंभीर आहे आणि यावर त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे. शासनाने, स्थानिक प्रशासनाने आणि नागरिकांनी एकत्र येऊन काम केले, तर आपण एक स्वच्छ आणि आरोग्यदायी शहर निर्माण करू शकतो.









