• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

अबब ! पाणीपुरवठा करीता करोडो रुपये खर्च तरीपण होतोय पर्यटन नगरीत नळाद्वारे बाराही महिने हिरवट पिवळसर रंगाचा दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा! शहरवासीयांच्या आरोग्याला मोठा धोका? जनता त्रस्त

गावमत by गावमत
May 23, 2022
in महाराष्ट्र
0
अबब ! पाणीपुरवठा करीता करोडो रुपये खर्च तरीपण होतोय पर्यटन नगरीत नळाद्वारे बाराही महिने हिरवट पिवळसर रंगाचा दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा! शहरवासीयांच्या आरोग्याला मोठा धोका? जनता त्रस्त
0
SHARES
18
VIEWS

लोणार /लुकमान कुरैशी

लोणार नगर पालिका नळाला सोडत असलेल्या अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्या धोक्यात येत असल्या बाबत नमुद विषयाचे निवेदन भाजपा शहराध्यक्ष गजानन मापारी यांनी आज दिनांक १९ मे रोजी तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी बुलढाणा यांना दिले आहे दिलेल्या निवेदनात नमूद प्रमाणे जागतिक कीर्ती, पर्यटन ‘अ’दर्जा, वन्यजीव अभयारण्य दर्जा प्राप्त लोणार शहरात अंदाजे २० वर्षा पासून लोणार नगर परिषदे मार्फत हिरवट, पिवळसर रंगाचे की ज्या पाण्यातून दुर्गंध येते असे दुर्गंधीयुक्त पाणी उन्हाळ्यातच नव्हे तर बाराही महिने लोणार वासियांना नगर पालिके मार्फत पुरविले जात असल्याने लोणार वासीयांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे. दुषित व दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत असल्या बाबत वेळोवेळी नागरीकांनी नगर पालिकेकडे तक्रारी, आंदोलने करून ही नगर पालिका प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही तसेच नळ सुद्धा ३० ते ४० दिवसाच्या कालावधीत येत असल्याने तक्रार न करता जसे पाणी येईल तसे भरून घेत आहे पिण्यासाठी विकतचे पाणी वापरण्याचा मार्ग नाईलाजास्तव लोणार वासियाने अवलंबलेला आहे. नळाला सोडण्यात येणारे पाणी पिण्याचे तर सोडा ते वापरण्याच्या सुद्धा योग्य नाही परंतु नगर पालिकेचा नळकर भरत असल्याने नागरीक नळाचे पाणी वाया न जाऊ देता पिवळे व दुर्गंधीयुक्त पाणी वापरत असुन पिण्यासाठी खाजगी टँकरचे ३०० रु. किमतीचे टँकर विकत घेत आहेत. सदर पाणी हे १५ दिवस पुरत असून महिन्याकाठी ६०० रु. खर्च पिण्याच्या पाण्यासाठी नागरीकाना करावा लागतो तसेच पिण्यासाठी दररोज २० लिटरचे जारचे  आर.ओ.चे पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे.परंतु गरीबांनी काय करावे महागाईने आकाश गाठले आहे मग गरीब माणसांनी काय करावे की जे टँकर व फिल्टरचे पाणी विकत घेवू शकत नाही ते गरीब मात्र पिवळे व दुर्गंधीयुक्त पाणी पिऊनच तहान भागवीत आहे.शहराच्या दवाखान्यात सर्वात जास्त गरीबच दिसत आहे या पाण्या मुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात येत असुन आर्थिक, शारीरिक व मानसिक नुकसान होत आहे.हे एक लोणार वासियांचे दुर्भाग्य याला सर्वस्वी लोणार नगर पालिका प्रशासन जबाबदार आहे. कारण लोणार शहरात पाणी टंचाई नाही विकत जेवढे मागाल तेवढे पाणी मिळते मग नगर पालिका प्रशासनास लोणार पर्यटन नगरीला नियमानुसार ३ ते ४ दिवसा आड पाणी पुरवठा का करता येत नाही तसेच लोणार हे पर्यटन ‘अ’ दर्जा प्राप्त असल्याने लोणार नगर पालिकेला करोडो रुपये निधी मिळतो. नगर पालिका प्रशासनाने शहरास पाणी पुरवठा करण्यासाठी करोडो रुपयाची पाईप लाईन, जलशुद्धीकरण प्लांट, व इतर असे पाणी पुरवठ्यावर करोडो रुपये खर्च केल्याचे कागदोपत्री दाखविले आहे. कारण खर्च केला असता तर लोणार शहर वासियांना पिवळे व दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा झाला नसता यावरून लोणार नगर पालिकेने कित्येक वर्षा पासून पाणी पुरवठावर केलेला करोडो रुपयाचा खर्च दाखवुन शासनाची व नागरीकांची दिशाभूल केली आहे का? पाण्यात ब्लीचिंग पावडर सुद्धा टाकण्यात येत नाही लाखो रुपये खर्च करून ही जर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारी नगर परिषद बरखास्त का करण्यात येऊ नये! तरी जिल्हाधिकारी साहेबांनी नगर परिषदेला त्वरित बरखास्त करावे. प्रत्येक वार्डात घाणीचे साम्राज्य पसरले आहे तीन तीन महिने नाल्याच्या सफाई सुध्दा होत असे आरडाओरडा होत आहे पण नगर परिषदेच्या कानावर जु पण रेंगत नाही अश्या घलतान कारभार करणार्‍या नगर परिषद ला बरखास्त करावे अशी आरडाओरडा शहरात प्रत्येक वार्डात होत आहे. मग आरोग्यावर होणारा खर्च कागदोपत्री आहे का? असे शहरात चर्चेला उधाण आले आहे एवढे असूनही नगर परिषद कुंभकर्णी झोपेत आहे का? या मुळे अनेक ठिकाणी चोरीला जाण्याची शक्यता बाळगता येत नाही! जवळपास अनेक वस्तू नकाशातुन गायब होत असल्याची चर्चा पण जोरधरत आहे अनु अ दर्जा प्राप्त नगर परिषद झोपेत आहे अशी पण चर्चा शहर वासियां मध्ये होत आहे. जनतेच्या समस्या सोडविणारी नगर परिषद कोठे आहे! असा प्रश्न जनते मध्ये निर्माण होत आहे.    

लोणार शहर वासियांना दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत असतांना सुद्धा नागरीकांनी निवडून दिलेले नगर सेवक यांना त्यांच्या प्रभागात येत असलेले हिरवट पिवळे दुर्गंधीयुक्त पाणी दिसत नाही का ? निवडणुकीला उभे राहिल्या नंतर तुमच्या सर्व समस्या सोडविण्याचे दिलेले आश्वासनाचा सुद्धा विसर नगर सेवक यांना पडल्याचे चित्र लोणार शहरात दिसुन येत आहे. लोणार नगर पालिकेने लोणार वासियांकडून कोरोना काळात हाताला काम नसतांना देखील गावात फिरून घरकर,नळकर करोडो रुपये वसूल केले आहे. व नगर पालिका दरवर्षी करवसुली भरून घेते मंग हे वसुल झालेले करोडो रुपये नागरिकांच्या मुलभूत सुविधेसाठी खर्च का करत नाही.
लोणार शहरात दुर्गंधीयुक्त पाणी ही एकच समस्या नसून शहरात जागो जागी घाणीचे साम्राज्य तसेच गल्लोगल्ली डुकरे, कुत्रे, गायी यांचा मुक्तसंचार आहे. येथे आलेल्या पर्यटकाला सर्व प्रथम डुकरे, कुत्रे जनावरे यांना सामोरे जावे लागते तसेच महिला व पुरुषांसाठी बसस्थानका पासून ते धारातीर्थ व इतर मंदिराच्या रस्त्याला शौचालय तर सोडा साधे लघुशंका करीता मुत्रीघर सुद्धा नाही. फक्त नगर पालिका ही लोणार वासियांना स्वच्छ व सुंदर  परिसर ठेवण्याचे आदेश देते. लोणार वासियांना तर समस्या आहेत पण येथे येणा-या पर्यटकांना सुद्धा मुत्रीघर, रस्ते खराब असणे,पिण्याची पाण्याची सोय नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र लोणार येथे आहे. सदर बाबीमुळे मात्र पर्यटन अ दर्जा प्राप्त लोणार शहरास गालबोट लागत असल्याची चर्चा सुद्धा दबक्या आवाजात लोणार शहरवासी तसेच येणारे पर्यटक करतांना दिसुन येत आहे. नगर पालिकेला स्वच्छतां,पाणी पुरवठा,मुलभूत सुविधे करीता निधीच येत नाही का की आलेला निधी फक्त कागदोपत्री दाखवुन मिळून मिसळून खाणे सुरु आहे. ? असे एक नाही तर अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाले आहेत. कित्येक वर्षा पासुन व आज रोजी सुद्धा नगर पालिकेचे घरकर,नळकर भरला असतांना लोणार वासियांना हिरवट पिवळसर पाणी दुषित पाणी पुरवठा नळाद्वारे सोडल्या जात आहे. लोणार नगर पालिकेने करवसुली मोहीम घरोघरी जावून नागरीकांना कर न भरल्यास तुमच्या नावाचे फ्लेक्स बोर्ड व नावे वृत्त पत्रात छापण्यात येतील व इतर कायदेशीर रित्या धमकावुन करोडो रुपये वसुली केले ही बाब योग्य आहे,मग वसुली ज्या प्रमाणे केली त्याच प्रमाणे नळाला नियमित व स्वच्छ पाणी पुरवठा करणे, स्वच्छता ठेवणे व इतर मुलभूत सुविधा पुरविणे हे नियमानुसार नाही का की फक्त नियम नागरीकासाठी आहे. घरकर व पाणीकराची जमा झालेली करोडो रुपयाची वसुली नेमकी कोणत्या कामावर खर्च करण्यात आली. शासनाकडून नगर पालिकेला मिळालेला पाणी पुरवठा व स्वच्छता निधीची तसेच १२ वर्षापुर्वी पासुन ते आज पर्यंत केलेली सर्व पाणी पुरवठा व स्वच्छता विषयक कामांची आपण प्रत्यक्ष पाहणी करून सखोल चौकशी करावी.जेणे करून लोणार वासियांना नळाला शुद्ध व नियमित पाणी पुरवठा होईल. तसेच आपण प्रत्यक्ष शहराची पाहणी करून लोणार पर्यटन अ दर्जा प्राप्त असल्याने तसेच जागतिक कीर्ती व वन्यजीव अभयारण्य दर्जा प्राप्त असल्याने लोणार पाहण्यासाठी येणा-या पर्यटकांना मुलभूत सुविधा आहेत किंवा कसे याची पाहणी करावी.
लोणार वासियांना नळाद्वारे शुद्ध पाणी पुरवठा न झाल्यास तीव्र स्वरूपाचे जन आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा निवेदना अंती देण्यात आला आहे. सदर निवेदनावर भाजपा शहराध्यक्ष गजानन मापारी, जिल्हा सदस्य विजय मापारी, जिल्हा सचिव भाजयुमो उध्दव आटोळे,पंढरी मापारी,प्रकाश नागरे, सुरेश अंभोरे,राजेश पुरी, सुनील मापारी,पंकज नागरे, दादाराव सानप,भगवान सानप,माधव मापारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.लोणार शहरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे तेव्हा सदर निवेदना नुसार जिल्हाधिकारी यांच्याकडून कारवाई होऊन शहरास स्वच्छ पाणीपुरवठा होणार की निवेदनावर दुर्लक्ष होणार याकडे लोणार वासियांचे लक्ष वेधले आहे.एवढे मात्र खरे ! 

Related Posts

महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले

April 7, 2026
दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
महाराष्ट्र

दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

September 29, 2025
विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल
महाराष्ट्र

विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल

July 31, 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार
महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार

June 14, 2025
शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..
महाराष्ट्र

शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..

June 7, 2025
महाराष्ट्र

वाहनांना ‘एचएसआरपी’ नाही; मग’आरटीओ’तील कामे विसरा !२०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी बंधनकारक : नंबर प्लेटसाठी ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य

June 7, 2025
Next Post

‍बँक ऑफ महाराष्ट्र हसनाबादचे शाखा व्यवस्थापकाची स्वातंत्र्य सैनिक वारस पत्नीस थकीत रक्कम अदा करण्यास टाळाटाळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In