बँक व्यवस्थापकांनी तहसिलदारांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली
जालना / तुकाराम राठोड
बँक आँफ महाराष्ट्र शाखा हसनाबाद चे शाखा व्यवस्थापकांना स्वातंत्र्य सैनिका चे खात्यावरील निवृत्तीवेतन वर्ग करण्याचे तहसिलदार भोकरदन यांनी लेखी आदेश देवूनही सुध्दा बँक ऑफ महाराष्ट्र चे शाखा व्यवस्थापक थकित निवृतीवेतन खात्यावर वर्ग करीत नसल्यामुळे बँकेच्या विरोधात दि.13 जुन 2022 पासून विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे अमरण उपोषण करणार असल्याचा ईशारा टाकळी कोलते येथील स्वातंत्र्य सैनिक वारस पत्नी सरुबाई रंगनाथ कोलते यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड व जिल्हाधिकारी जालना यांच्याकडे एका निवेदनाद्वारे दिला आहे.
स्वातंत्र्य सैनिक वारस पत्नी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माझे पती स्वातंत्र्य सैनिक कै.रंगनाथ लक्ष्मण कोलते हे दिनांक 01/07/2021 रोजी मयत झाले असून ते मयत झाल्यामुळे वारसाने माझ्या नावाने जिल्हाधिकारी जालना यांनी दिनांक 24/01/2022 रोजी एका आदेशान्वये माझ्या नावाने निवृत्तीवेतन मंजूर झाले व त्यानंतर तहसिलदार भोकरदन यांनी माझ्या पतीच्या खात्यावर असलेली रक्कम वारसाने माझे खात्यावर जमा करावे म्हणून लेखी पत्र बँक ऑफ महाराष्ट्र शाखा हसनाबाद यांना दिनांक 09/02/2022 रोजी देऊनही सुध्दा अदयाप पर्यंत बँक व्यवस्थाकांनी माझे खात्यावर रक्कम जमा न करता उडवा उडवीचे उत्तर देत आहे. बँक ऑफ महाराष्ट्र हसनाबाद चे कर्मचारी हे भोकरदन तहसिल कार्यालयातून स्वातंत्र्य सैनिकाचे निवृत्तीवेतनचा चेक दोन दोन महिने स्वातंत्र्य सैनिकाच्या खात्यावर जमा करीत नाही त्यामुळे बँकेत ज्या स्वातंत्र्य सैनिकांचे खाते आहे ते त्रस्त असून बँककडून स्वातंत्र्य सैनिकावर नेहमीच अन्याय होत असल्यामुळे व दरमहा निवृत्तीवेतन बँक देत नसल्यामुळे वयोवृध्दपणे स्वातंत्र्य सैनिकांना त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे वरीष्ठाने तात्काळ दखल घेवून तहसिलदार भोकरदन यांचे आदेशानुसार माझ्या खात्यावर थकीत रक्कम अदा करण्याचे आदेश दयावे माझे खात्यावर थकीत रक्कम जमा न झालयास मी विभागीय आयुक्त औरंगाबाद व बँक ऑफ महाराष्ट्र समोर आमरण उपोषण करणार असल्याचा ईशार स्वातंत्र्य सैनिक सरुबाई कोलते यांनी दिला आहे.








